Life In लोकल- तिला पाहताच तो प्रेमात पडला आणि तिच्यासाठी तो तीच ट्रेन पकडू लागला

Life In लोकल- तिला पाहताच तो प्रेमात पडला आणि तिच्यासाठी तो तीच ट्रेन पकडू लागला

रोहित पुजारे त्याच्या मित्राची एक अशी लव्हस्टोरी सांगणार आहे जी वाचून तुम्हाला मुंबई लोकलमधील प्रवासाची एक वेगळी बाजूही कळेल.

  • Share this:

मुंबई, 24 जून- ट्रेनमधली भांडणं आतापर्यंत सगळ्यांनीच ऐकली आणि पाहिली असतील. पण मी रोहित पुजारे आज माझ्याच मित्राची एक अशी लव्हस्टोरी सांगणार आहे जी वाचून तुम्हाला मुंबई लोकलमधील प्रवासाची एक वेगळी बाजूही कळेल. तशी माझी आणि त्याची ट्रेनमधलीच मैत्री. काही दिवस ठरलेली ट्रेन आणि ठरलेल्या जागेवर बसत प्रवास केल्यामुळे ओळख झाली. तसा तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. सुरुवातीला आमच्यात वर वरचं ऑफिस, शिक्षण, घर यांबद्दल चर्चा व्हायच्या. हळूहळू आम्ही अधिक मोकळेपणाने बोलू लागलो.

तेव्हा मला कळलं की आम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करायचो त्याच ट्रेनमधून तीही प्रवास करायची. दोघं जवळपासच कुठे तरी राहत होते आणि अनेकदा शेअरिंग रिक्षाच्या रांगेत एकमेकांना दिसायचे. लव्ह अॅट फर्स्ट साइट म्हणजे काय हे कोणीही त्याला पाहिलं की मानेल.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

या सगळ्यात तिच्याकडून मात्र कोणतेच सिग्नल नव्हते. असा एक मुलगा तिच्यावर जीव ओततो हे तिला माहीतही नव्हतं. तिच्याचसाठी, तिला पाहता यावं म्हणून तो घरातून पाऊण तास लवकर निघायचा. त्याचं एकतर्फी प्रेम पाहून आपल्याकडून त्याला काही मदत करता येईल का याचा विचार केला.

शेवटी मित्राला एकदिवस तिच्याच रिक्षातून स्टेशनपर्यंतचा प्रवास करायला सांगितला. किमान तू कोण आहे हे चेहऱ्याने तरी तिला कळू दे यासाठी तो आठवडाभर तिच्याच रिक्षातून स्टेशनपर्यंत यायचा. अगदी काही दिवसांमध्येच दोघांची तोंड ओळख झाली आणि आता दोघं फोनवर, व्हॉट्सअॅपवर बोलतात. आधी माझा प्रवास ती कशी असेल हे ऐकण्यात जायचा. तर आताचा प्रवास ती कशी आहे हे ऐकण्यात जातो. दोघांचं नातं किती पुढे जाईल मला माहीत नाही पण ट्रेनमधली मैत्री, प्रेम, जिव्हाळा याची नवी बाजूही मला दिसली.

हेही वाचा- 

Life In लोकल-काळ्या- पांढऱ्या कपड्यांकडे पाहून पोरांनी दुसऱ्या दारातून उडी टाकली

Life In लोकल- फाटक्या कपड्याच्या बाईने पैशांची ती बॅग उचलली आणि...

Life In लोकल- ती मुलगी ट्रेनमध्ये आईसाठी भांडता भांडता बेशुद्ध पडली

Life In लोकल- जरा लवकर निघालो असतो तर...

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: June 24, 2019, 11:09 AM IST

ताज्या बातम्या