Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

जिच्यावर प्रेम नाही पण नातं आहे तिला निवडावं की जिच्यावर अतोनात प्रेम आहे तिची निवड करावी, या विचारात दोन दिवस गेले.

  • Share this:

मुंबई, ३ एप्रिल- मला माहितेय, तू काही तरी नक्की करशील. तिच्या त्या शब्दांनीच माझ्या मनाला उभारी मिळत होती. नोकरीचा शोध सुरू होता. पण, कुठंतरी माशी शिंकत होती. हाती आलेली नोकरी निघून जायची. पण आम्ही दोघांनीही हार मानली नव्हती. कितीही आता थांबायचं नाही हाच विचार दोघं सतत करत होतो. मला समजून घेणारी, विचार जुळणारी एक मुलगी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आली होती. काही गोष्टी मागे वळून पाहताना त्रास होत होता. पण, उम्मीद पे दुनिया कायम है म्हणत काही तरी नक्कीच चांगलं होईल या आशेवर दोघं जगत होतो. तसंच कल किसने देखा असं म्हणत आजचा दिवस एकमेकांसोबत मनोसोक्त जगायचा असं आम्ही ठरवलं होतं. एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे दररोज भेटत होतो. चहा, कॉफी, नाश्ता, जेवण एकत्र होऊ लागलं. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत होता. मनासारखी साथ मिळाली म्हणून प्रत्येक दिवस अगदी आनंदात जात होता.

एकमेकांच्या वर्तमानात असल्याचं सुख असल्यामुळे एकमेकांच्या भुतकाळात दोघांना काही रस नव्हता. आता त्या आयुष्याच्या स्वप्नात दोघं खुप पुढे गेले होते.

एकदिवस काम संपल्यानंतर दोघं एकत्र स्टेशनला जायला निघालो तेव्हा ती सहज बोलून गेली तू माझ्यापेक्षा दोन स्टेशन पुढे राहतोस म्हणजे लग्नानंतर १५ मिनिटांचा माझा प्रवास अजून वाढणार. यावर दोघंही खळकळून हसलो.

ती फार मेहनती होती. १० तासांच ऑफिस करून ती घरकामात आईला मदतही करत होती. स्वयंपाक तर उत्तम करायची. ट्रेनमधून जाताना तुफान गर्दीतही आमचा फोन सुरूच असायचा. नेहमीप्रमाणे नेटवर्क त्रास देत होतं, पण तरी चाललं होतं. दिवस मस्त चालले होते आणि अचानक आईचा मला फोन आला. 'नोकरी लागली तर मग लग्नाचं घे मनावर.. मामाची मुलगी असली म्हणून काय झालं. एवढे दिवस थांबवून ठेवणं बरं दिसत नाही.'

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

माझ्या आईने ५ वर्षापूर्वीच मामाच्या मुलीला माझ्यासाठी विचारलं होतं. तेव्हा मीही होकार देऊन बसलो. त्यानंतर कामानिमित्त मुंबईत आलो आणि ही भेटली. हिला भेटल्यानंतर सारी गणितंच बदलली होती. जिच्यावर प्रेम नाही पण नातं आहे तिला निवडावं की जिच्यावर अतोनात प्रेम आहे तिची निवड करावी, या विचारात दोन दिवस गेले. मी तिला घेऊन निघून गेलो तर... ती येईल का... पण मग आईचं काय होईल.. असे एक ना अनेक प्रश्न मला पडत होते. काय करावं सुचेना. अखेर मनावर दगड ठेवून मी तिला नकार कळवला. कानात उकळतं तेल ओतावं तसं तिचं झालं...

क्रमश:

- मधुरा नेरुरकर

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2019 08:55 AM IST

ताज्या बातम्या