इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेट (Cricket) स्पर्धा ही अल्पावधीतच क्रिकेटविश्वातली सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक लीग ठरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आयपीएल समितीतर्फे दर वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जात असून, 2022 अखेरपर्यंत या स्पर्धेचे पंधरा मोसम पार पडले आहेत.
आयपीएल (IPL) ही अनेकार्थांनी क्रिकेटमध्ये नवे पायंडे पाडणारी स्पर्धा ठरली आहे. फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळांमध्ये लीग स्पर्धा प्रचलित आहेत. युरोपमधल्या जवळपास प्रत्येक देशाची स्वतंत्र फुटबॉल लीग अ