Elec-widget

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

मी संतोष जोशी सध्या राहायला पुण्यात असतो पण कॉलेज, सुरुवातीच्या नोकऱ्या माझ्या मुंबईत झाल्या. माझ्यासाठी मुंबई म्हणजे मित्र, ट्रेनचा प्रवास आणि गाजवलेल्या एकांकिका...

  • Share this:

मुंबई, 22 मे-  मी संतोष जोशी सध्या राहायला पुण्यात असतो पण कॉलेज, सुरुवातीच्या नोकऱ्या माझ्या मुंबईत झाल्या. माझ्यासाठी मुंबई म्हणजे मित्र, ट्रेनचा प्रवास आणि गाजवलेल्या एकांकिका... मी सांगणारा किस्सा माझ्या कॉलेज दिवसांमधला आहे. कॉलेजमध्ये असताना आम्ही दरवर्षी एकांकिकामध्ये भाग घ्यायचो. ज्यांनी एकांकिकामध्ये काम केलं त्यांना याची जादू काय असते हे नक्कीच माहीत असेल. आपल्याच घरातलं लग्न असल्यासारखं प्रत्येकजण स्वतःहून एकांकिका सर्वोत्तम व्हावी यासाठी जीव ओतून काम करत असतो.

एखाद वेळेस खिशातले असतील नसतील ते पैसे देण्याची अनेकांची तयारी असते पण सेटला कोणीही हात लावलेला चालत नाही. ती आमची साधारण ५०-५५ लोकांची एकांकिका होती आणि एका गरीब लोकवस्तीच्या जीवनावर आधारित त्याची कथा होती आणि आम्ही जवळपास भिकारी दिसू अशा वेशात होतो. सर्व मुलं आम्ही विशीच्या आतलेच होतो. ३० मुलं आणि २५ मुली असा आमचा गोतावळा ११ वाजता आमचं reporting होतं. आम्हाला जायचं होतं बोरिवली ते चर्नी रोड आणि आमच्याबरोबर झोपडपट्टीचं नेपथ्य होतं.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

Loading...



----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अशावेळी ऑफीस वेळेत ट्रेन पकडणे म्हणजे दिव्य होतं. आमची ही अवस्था पाहून स्टेशन वरील प्रवाशांनी आम्हाला ज्या पद्धतीने मदत केली तो क्षण मला अजूनही स्पष्ट आठवतोय. आम्ही जणू त्यांचीच मुलं होतो आणि ते आम्हाला एकांकिकेच्या स्पर्धेत घेऊन जात होते असाच अनुभव आम्हाला तेव्हा आला. तेव्हा आम्हाला आमचं सामान आणि ५५ मुलं एका ट्रेनमध्ये नेणं हे एकांकिका करण्यापेक्षा जास्त रोमांचक वाटत होतं. ज्या लोकांनी आम्हाला ट्रेनमध्ये चढायला जागा दिली तेच आम्हाला अंतिम फेरीत गेल्यावर एकांकिका पाहायला नक्की बोलवा असंही ते म्हणाले.

आमचं नेपथ्य खराब होणार नाही म्हणून अनेकांनी ते सामान आपल्या डोक्यावरही घेतलं होतं. लोकलमधल्या चाकरमानी लोकांमध्ये एक तेवढाच तरुण उत्साही विद्यार्थी असतोच जो आमच्या सारख्या मुलांच्या मदतीसाठी सतत तत्पर असतो. त्या एका अनुभवानंतर मुंबई ट्रेनची भीती कायमची गेली आणि लोकलसाठीचा एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला.


हेही वाचा-

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...