Life In लोकल- जरा लवकर निघालो असतो तर...

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 12:08 PM IST

Life In लोकल- जरा लवकर निघालो असतो तर...

मुंबई, 03 जून- मी प्रबोध शेट्टे आतापर्यंत अनेकांकडून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याचे किस्से ऐकले आहेत. पण या सगळ्यात माझ्या मित्रासोबत घडलेला अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट बाजू असते. यातली एक गोष्ट वगळून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ट्रेनच्या प्रवासाचंही असंच काहीसं आहे. हा प्रवास तुम्ही कशा पद्धतीने करताय त्यावर सारं काही अवलंबून असतं. या प्रवासातून आयुष्याला पुरतील एवढ्या आठवणी तयार होतात तर काही वेळा ट्रेनमधला तो एक क्षण आयुष्यभर मनात सलत राहतो.

मला अजूनही तो दिवस लख्ख आठवतोय. मामी फिल्म फेस्टिवलचे ते दिवस होते. सकाळी १० वाजता सिनेमाची डीव्हीडी आम्हाला काही करून तिथे द्यायची होती. मी ठरल्याप्रमाणे बोरिवलीवरून सकाळी साधारण ८.३० ची ट्रेन पकडली. माझा मित्र दादरवरून डीव्हीडी घेऊन चढणार होता. पण नेहमीप्रमाणे त्याला निघायला उशीर झाला आणि आम्ही जे नियोजन केलं होतं, ते सगळंच बिघडलं होतं. आम्ही मुंबई सेंट्रलला त्याची वाट पाहत होतो. त्याने गर्दी कमी होण्यासाठी दोन- तीन ट्रेन सोडल्या पण तरीही त्याला ट्रेन पकडता आली  नाही. दुसरीकडे मामी महोत्सवाची वेळही जवळ येत होती. काही करून आम्हाला ती डीव्हीडी तिथे १० वाजण्याच्या आत पोहोचवायची होती.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Loading...

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.



----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अखेर त्याने असं काही केलं ज्याचा आम्ही कोणीच विचार करू शकत नव्हतो. त्याने चक्क इंजीनच्या मागचा जो बंद दरवाजा असतो तो पकडला आणि दादर ते मुंबई सेंट्रल लटकत प्रवास केला. यावेळी त्याला आपला हात सुटला तर... तोल गेला तर.. असे एक ना अनेक वाईट विचार मनात आले. त्या एका क्षणाने त्याला संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून गेलं. १० मिनिटं लवकर उठलो असतो तर असा जीवघेणा प्रवास करायला लागला नसता हा विचार राहून राहून त्याच्या मनात येत होता. मुंबई सेंट्रलचं स्टेशन विरुद्ध दिशेला येत असल्यामुळे त्याला त्या स्थानकावरही उतरता आलं नाही. अखेर तो ग्रँट रोडला उतरला आणि उलटा प्रवास केला. त्या एका अनुभवानंंतर त्याने कधीच ट्रेनमधून जीवघेणा प्रवास केला नाही आणि वेळेत ट्रेन पकडणं किती महत्त्वाचं असतं तेही त्याला कळलं.


हेही वाचा-

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...