मुंबई, 8 ऑगस्ट : विज्ञान आणि तंत्रज्ञान सध्या प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. यामुळेच मनुष्य सध्या निसर्गाचे नियमही मोडीत काढत आहे. याचा परिणाम आपल्या राहण्यावरही झाला आहे. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या ठिकाणीही मानवाने वसाहत स्थापन करून दाखवली आहे. पाण्याच्या खाली असो, किंवा अगदी अंतराळात... मनुष्य कुठंही वसाहत उभारण्यासाठी सज्ज झाला आहे. आता मालदीव (Maldives) देशात आता चक्क पाण्यावर तरंगणारं शहर (Floating City) वसवण्यात येत आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा असतील, काय खास असेल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 'आज तक'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.