Life In लोकल- त्या काळ्या- पांढऱ्या कपड्यांकडे पाहून पोरांनी दुसऱ्या दारातून उडी टाकली

त्यांच्यातील काहींना टीसी आला तर काय ही भीती वाटत होती. १० रुपयांसाठी २०० द्यावे लागतील एवढंच नाही तर चारचौघांमध्ये इज्जत जाईल ती वेगळीच.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 12:13 PM IST

Life In लोकल- त्या काळ्या- पांढऱ्या कपड्यांकडे पाहून पोरांनी दुसऱ्या दारातून उडी टाकली

मुंबई, 20 जून- मुंबईच्या ट्रेनमध्ये तुम्हाला एकाहून एक सरस लोकं सापडतील. एकीकडे भावनिक गुंतागुंत असते तर दुसरीकडे ट्रेनमध्ये चढण्या- उतरण्याचा फक्त व्यवहार असतो. एकच ट्रेन पकडून वर्षांनूवर्ष प्रवास केलेले प्रवासी असतात तर काही जी मिळेल ती ट्रेन पकडून प्रवास करणारेही असतात. काही नियमांचं पालन करणारे तर काही रिस्क घेऊन प्रवास करतात. या रिस्क घेऊन प्रवास करणाऱ्यांचाच एक भन्नाट किस्सा माझ्यासोबत काही दिवसांपूर्वी घडला. मी कौस्तुभ सावंत तुम्हाला हाच किस्सा सांगणार आहे.

मी जोगेश्वरीला राहतो. कामानिमित्त मला चर्चगेटला जायचं होतं. मी दुपारी चर्चगेटला जाणारी फास्ट लोकल पकडली. दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनला फारशी गर्दीही नव्हती. मुलांचा एक ग्रुप कोपऱ्यात गप्पा मारत बसला होता. तर काही आपआपल्या मोबाइलमध्ये व्यग्र होते. त्या मुलांच्या ग्रुपने तिकीट न काढता ट्रेन पकडली होती. त्यामुळे त्यांच्यातील काहींना टीसी आला तर काय ही भीती वाटत होती. १० रुपयांसाठी २०० द्यावे लागतील एवढंच नाही तर चारचौघांमध्ये इज्जत जाईल ती वेगळीच.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Loading...

त्यांच्या या चर्चा सुरू असताना वांद्रे आलं. वांद्रे आलं तसं डब्यातले काही चार- पाच लोक उतरले आणि दोन पुरूष चढले. त्या पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. त्यात काळ्या रंगाचे बूटही होते. ते डब्यात चढताच इकडे- तिकडे पाहू लागले. त्या माणसांकडे पाहिल्यावर कोणीही ते टीसी आहेत असंच म्हटलं असतं. माझ्याही डोक्यात सुरुवातीला तोच विचार आला आणि मी तिकीट दाखवण्यासाठी म्हणून खिशाकडे हात नेला. एवढ्यात त्या मुलांनीही त्या माणसांना पाहिलं आणि माझा खिशाकडे जाणारा हात पाहिला. ते सर्वच एवढे घाबरले की, 'ए टीसी आला...' असं म्हणतं सगळे धावले आणि प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेच्या दरवाजातून ट्रेन सुरू होण्यापूर्वीच उडी मारली.

त्या लोकांचा गोंधळ पाहून सगळ्यांनीच त्यांच्याकडे पाहिलं थोड्यावेळ नक्की काय झालं हे कोणालाही कळलं नाही. नंतर टीसी असतील असा संशय आलेल्या माणसांनीच ते टीसी नसून कॅटरिंगमधले आहेत असं सांगितलं आणि आपली ऑर्डर संपवून ते जात असल्याचं ते म्हणाले. हे कळताच ट्रेनमध्ये जो हशा पिकला तो मी अजूनही विसरू शकत नाही. त्या मुलांना ही गोष्ट कळली नाही. पण आम्ही सर्व मात्र पोट धरून हसत होतो. एखाद्याची दहशत काय असते हे तेव्हा मी पाहिलं.

हेही वाचा-

Life In लोकल- फाटक्या कपड्याच्या बाईने पैशांची ती बॅग उचलली आणि...

Life In लोकल- ती मुलगी ट्रेनमध्ये आईसाठी भांडता भांडता बेशुद्ध पडली

Life In लोकल- जरा लवकर निघालो असतो तर...

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 10:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...