Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

मुंबईची ट्रेन ही एकमेव अशी जागा असेल जिकडे प्रत्येक माणसाला निरखून पाहिलं जात असेल आणि त्याच्या पेहरावावरून तो काय काम करत असेल.. त्याचा स्वभाव कसा असेल.. इथपर्यंत साऱ्याचंच मोजमाप होत असेल.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 09:30 PM IST

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

मुंबई, 3 मे- मायानगरी मुंबईत प्रत्येकजण स्वतःच्या विश्वातच एवढा असतो की बाजूला काय सुरू आहे हे अनेकदा माहीतही नसतं. पण मुंबईची ट्रेन ही एकमेव अशी जागा असेल जिकडे प्रत्येक माणसाला निरखून पाहिलं जात असेल आणि त्याच्या पेहरावावरून तो काय काम करत असेल.. त्याचा स्वभाव कसा असेल.. इथपर्यंत साऱ्याचंच मोजमाप होत असेल. याचा अनुभव मी भाग्येश कासेकरनेही घेतला आहे.

ही माझ्या कॉलेजच्या दिवसांमधली गोष्ट आहे. मी राहायला अंधेरीला पण कॉलेज जेजे सीएसटीला असल्यामुळे नेहमी ट्रेनचाच प्रवास घडायचा. त्यात सेकण्ड क्लासची गर्दी नको म्हणून तेव्हा फर्स्ट क्लासचा पास काढलेला होता. कॉलेजचे दिवस असल्यामुळे कपडे, केस यांच्याकडे कधी फार लक्ष दिलंच नाही. त्याची कधी गरजही वाटली नाही.या प्रवासात मला नेहमी एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन. मी सहसा कॉलेजला जाताना हार्फ पॅन्ट, थ्री फोर्थ, टी- शर्टमध्येच जायचो. मी जसा अंधेरीहून फर्स्ट क्लासच्या डब्यात चढायचो लोक माझ्याकडे निरखून पाहायचे. सुरुवातीला मला हे कळलं नाही. पण नंतर मी निरीक्षण करायला लागलो आणि मला लक्षात आलं की नेहमी त्या गाडीत असणारे चेहरे माझ्याबद्दल चर्चा करत असतात. त्यांच्या चर्चेचा मुख्य विषय माझे कपडे आणि केसच असायचे.

Loading...


फर्स्ट क्लासमध्ये हा मुलगा मुद्दाम तर चढला नाही ना.. सेकंड क्लासमधली गर्दीचा त्रास नको म्हणून हा फर्स्ट क्लासमध्ये तर चढला नसेल हे प्रश्न मला त्यांच्या डोळ्यात दिसायचा. मग काय मी चुकीच्या डब्यात चढलोय याची जाणीव ते मला त्यांच्या टोमण्यातून आणि वागणुकीतून दाखवायचे. न राहून एक दिवस मी त्यांना माझा महिन्याचा फर्स्ट क्लासचा पास दाखवला. मला आजही हा प्रश्न पडतो की किती वर्ष आपण लोकांना त्यांच्या पेहरावावरून ते शिक्षित आहेत की नाही... सुसंस्कृत आहेत की नाही... गरीब आहेत की श्रीमंत याचं मोजमाप करणार. तसं करायलाही काही हरकत नाही, पण खरंच आपल्याला आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज आहे का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. चांगले कपडे घातल्यावरच फर्स्ट क्लासमध्ये बसायला मिळतं हा काही नियम आहे का? जर एखादा माझ्यासारखा असेल तर स्वतःला सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणणारे त्याला अशाच नजरेने पाहणार का हाच खरा प्रश्न आहे.

हेही वाचा-

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ऐन गर्दीत ते कपल पुरुषांच्या डब्यात चढलं आणि...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2019 10:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...