Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तो चांगलाच गांगरला, त्याने तिचा हात सोडला पण त्याचा पाय घसरला. जर मी त्याचे हात सैल धरले असते तर तो कदाचित ट्रेनखाली गेला असता पण

  • Share this:

मुंबई, 14 मे- मी सौरभ देशपांडे राहणारा दहिसरचा. माझं ऑफिस लोअर परळला आहे. पण कामा निमित्त अनेकदा महालक्ष्मीलाही जावं लागतं. त्यामुळे ट्रेनशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्याकडे नसतो. त्यातही गेल्या वर्षीपर्यंत मला अनेकदा रविवारीही कामावर जावं लागायचं. असाच एका रविवारी मी ऑफिसवरून लवकर निघालो आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरून दुपारी ३ वाजताची विरार फास्ट ट्रेन पकडली. मी सहसा बोरीवली ट्रेननेच प्रवास करतो. पण रविवार असल्यामुळे त्यातही दुपारची वेळ होती म्हणून मी विरार ट्रेन पकडली.

दहिसरला उतरायचे असल्यामूळे मी दरवाज्याच्या बाजूला उभा राहिलो. दादर स्थानकावर साधारणपणे 13 ते 14 वय असणारी एक मुलगी तिच्या वडिलांसोबत चढली. ती मुलगी तिच्या बाबांना विचारत होती की आपलं स्टेशन कोणतं... किती स्टेशननंतर येणार.. त्यांच्या त्या संभाषणातून मला कळलं की त्यांनाही दहिसरलाच उतरायचं होतं. तेही माझ्या बाजूला दरवाजाच्या कडेला उभे राहिले. वांद्र्यात २५ ते ३० वयाचा एक मुलगा चढला.

वांद्रे स्थानक हे विरूद्ध दिशेला येत असल्यामुळे तो आमच्या मागून थोड्या फार असलेल्या गर्दीतून वाट काढत माझ्या आणी त्या मुलीच्या वडिलांच्या मधून आमच्या पुढे जाऊन दरवाजात उभा राहीला. त्याची ही कृती मला फारशी आवडली नाही. मी त्याच्याकडे निरखून पाहिलं. मला त्याच्याकडे पाहून काही गोष्टी जाणवल्या. तो दिसायला सावळा होता, दाढीही वाढेलेली होती. तंबाखू खाणाऱ्या त्या मुलाचे कपडे मळलेले आणि केस विस्कटलेले होते. एका कानात चांदीसारख्या दिसणाऱ्या धातुची चमकी घातली होती. त्याच्याकडे पाहिल्यावर तो मजूर किंवा माथाडी कामगारही वाटत नव्हता. तो गर्दुल्या होता हे मी चटकन ओळखलं.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुरुवातीला त्याने काही मिनिटे शांत उभे राहण्यात घालवली. मग त्याची नजर जशी त्याच्याच मागे उभ्या असलेल्या मुलीवर पडली, त्याचं वागणं बदललं. तो एकाएक आयटम सॉंगसारखी गाणी जोरजोरात गाऊ लागला. त्या मुलीने बंद असलेल्या दरवाजाचे हँडल पकडले होते. त्याने तिच्या हाताला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, हे कळताच त्या मुलीने त्याचा हात झटकला आणि थोडी मागे सरकली. तिची हे वागणं मला आणि तिच्या वडिलांना सोडून कोणालाचं कळलं नाही. त्याचा इरादा लक्षात येताच मी मुलीच्या आणि त्या मुलाच्या दोघांच्या मध्ये जाणीवपूर्वक हात ठेवला आणि दरवाजाचे हँडल पकडले. जेव्हा त्याला हे जाणवले तो लगेच खाली बसला. मग पाच मिनिटांनंतर त्याने तिच्या पायाला हात लावायला सुरुवात केली.

त्याच्या या प्रकारामुळे ती मुलगी मला अजून अस्वस्थ वाटायला लागली. त्याच्या अशा कृतीची किळस मला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.तोवर ट्रेन बोरिवली स्थनकातून निघून दहिसरला पोहोचत होती. अचानक त्या मुलाला काय झालं माहीत नाही तो उठला आणि त्याने त्या मुलीचा हातच पकडला आणि तो तिच्यावर ओरडायला लागला,"कौन है तू? किधर से आयी है?" ती मुलगी खुपच घाबरली. तिने आर्जवी स्वरात तिच्या वडिलांना हाक मारत, 'बाबा.. बाबा...'म्हटलं. मी ते पाहून क्षणार्धात त्याचे दोन्ही हात पकडले आणि डोळे वटारुन त्याच्या वर खेकसलो, 'हात छोड लडकी का...' आणि मी त्याच्या हातावर जोरात एक बुक्का मारला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तो चांगलाच गांगरला, त्याने तिचा हात सोडला पण त्याचा पाय घसरला. जर मी त्याचे हात सैल धरले असते तर तो कदाचित ट्रेनखाली गेला असता पण असं काही झालं नाही. त्याचा फक्त तोल जात होता पण आम्हीच त्याला सावरलं. मी त्या मुलीला बाजूला व्हायला सांगितलं. या सर्व प्रकारामुळे तिचे वडिलही घाबरले होते. त्यांना मी तिला आत घ्यायला सांगितले. तो इसम गयावया करत म्हणाला, 'आज कल ऐसे बच्चे चोरी करने की बातें हो रही है, तो मुझे लगा की ये भी ऐसी ही है...'

तोपर्यंत दहिसर स्थानक आलं आणि त्या इसमाचा ताबा इतर प्रवशांनी घेत त्याला बडवायला सुरुवात केली. मी रागाने त्या मुलीच्या वडिलांना म्हटलं, 'साहेब आपल्या मुलीचं संरक्षण आपणच केलं पाहीजे, नुसतं नोकरी करुन पैसा कमवून मुलीला शिक्षण देऊन होत नाही त्यांचं संरक्षणही करावं लागतं.' दरम्यान मी रेल्वे पोलिसांना बोलावले आणि त्या चरसी माणसाला त्यांच्या ताब्यात दिले. खरं तर अशा व्यक्तींना मारामुळे काही अक्कल येत नाही पण आपण काही तरी चांगलं काम केलं आणि एका मुलीच्या उपयोगी आलो ही भावना तुम्हाला चांगली झोप देऊन जाते.

हेही वाचा-

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: May 14, 2019, 10:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading