Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

मी राकेश पिसाट माझ्यासोबत घडलेला एक किस्सा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी तेव्हा वाशी येथे काम करत होतो. राहायला गोरेगावला असल्यामुळे अर्थात ट्रेनशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्यासमोर नव्हता.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 02:17 PM IST

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

मुंबई, २ मे- मी राकेश पिसाट माझ्यासोबत घडलेला एक किस्सा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी तेव्हा वाशी येथे काम करत होतो. राहायला गोरेगावला असल्यामुळे अर्थात ट्रेनशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्यासमोर नव्हता. दररोज रात्री १०.३० ची वाशीवरून ट्रेन पकडण्याचा माझा क्रम असायचा. माझ्यासोबत माझा एक जवळचा मित्र होता. त्याला आम्ही नेहमीच एवढा तू शांत कसा रे.. तू फारच फट्टू आहेस.. तू फारच शामळू आहेस असं चिडवायचो.. बरं तो तसा होताच त्याने आयुष्यात कधीही एक झुरळही मारलं नसेल. पण त्या दिवशी त्याने असं काही केलं की आमची बोलतीच बंद झाली.

वडाळ्याला एक मुलगी चढली आणि ती दरवाज्याच्या बाजूला टेकून उभी राहिली होती. दरम्यान वाशीपासून चढलेला एक माणूस तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. तो प्यायलेला होता हे सगळ्यांना दिसत होतं. पण त्याला पुढच्या स्टेशनला उतरायचं असेल असं आम्हाला वाटलं. पण तो मुलीच्या बाजूला मुद्दाम उभा राहिलाय आणि तिला उद्देशून गातोय हे कळलं. ट्रेनमध्ये अजूनही १२ १५ जणं होती. शेवटी थी मुलगी आमच्या समोर येऊन बसली.
Loading...

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


तो माणूस इतका निर्लज्ज होता की तिच्या मागे तोही तिच्या बाजूला बसायला आला. यावेळी तो तिला खेटून बसला. आता मात्र ती मुलगी चांगलीच घाबरली होती. त्याला ती ओरडतही होती, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. आपल्यासोबत कोणी काही करू शकत नाही हे त्याला वाटलं असावं तेव्हा त्या माणसाने चक्क तिच्या खांद्यावर हात ठेवला.

एव्हाना ट्रेनमधल्यांनी त्याला झापायला सुरुवात केली होती. पण या सगळ्याचा कोणताच परिणाम त्याच्यावर होत नव्हता. दरम्यान, असं काही घडलं की मी ते आयुष्यात विसरू शकत नाही. माझा मित्र ज्याने संपूर्ण आयुष्यात अरेला का रे केलं नाही त्याने त्या छपरी माणसाची कॉलर पकडली आणि किमान साथ ते आठ मुक्के त्याला मारले. अचानकच्या या हल्ल्यामुळे तोही बावचळला. एवढं करून माझा मित्र थांबला नाही तर पुढच्या स्टेशनवर त्याने अक्षरशः त्या माणसाला ढकलून दिलं.

त्याचं हे रूप माझ्यासाठी पूर्णपणे वेगळं होतं. मी फक्त त्याच्याकडे आश्चर्यचकीत होऊन पाहत बसलो. तोही नंतर शांतपणे माझ्या बाजूला येऊन बसला आणि मला म्हणाला, 'हात दुखायला लागला रे..'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2019 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...