Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

अनेकजण मला गाण्यासाठी बोलवतात.. त्याबदल्यात पैसेही देऊ करतात.. मी मात्र पैशांसाठी गात नाही.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : आजपर्यंत तुम्ही ट्रेनमध्ये गाणी गाणारे, भजन  गाणारे ग्रुप पाहिले असतील. पण कधी असा माणूस पाहिला आहे का की जो एकटा गिटार वाजवत लोकलच्या डब्यांमधून लोकांना फक्त आनंद देत फिरतो. अशाच एका माणसाची आज आम्ही तुम्हाला ओळख करून देणार आहोत.

मुंबईच्या ट्रेनमध्ये अनेक अवलिये भेटत असतात.. काही सहज आपल्या डोळ्यांसमोरून निघून जातात तर काही आपल्या मनावर छाप सोडतात. लोअर परेल ते विरारदरम्यान प्रवास करणाऱ्या अशाच एका अवलियाची ओळख आज आपल्याला होणार आहे.. रोशन मुल्ला हे सीएनबीसीमध्ये काम करतात. दररोज विरार लोअर परेल प्रवासादरम्यान ते स्वत: सोबत गिटार घेऊन फिरतात. ट्रेनमधला १ तासाचा प्रवास गाणी गात आणि प्रवाशांचे मनोरंजन करत कसा संपतो ते त्यांचं त्याला कळत नाही. आपल्या याच प्रवासाबद्दल मुल्ला यांनी काही आठवणी शेअर केल्या आहेत..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गेल्या दीड वर्षांपासून मी ट्रेनमध्ये गिटार घेऊन प्रवास करतो. माझ्यासोबत माझा एक मित्रही असतो. योगा, मेडिटेशन यांची जशी आपल्या शरीराला आणि मेंदूला गरज आहे तशीच उत्तम संगीताचीही आपल्याला गरज आहे. मला याचंच महत्त्व लोकांनपर्यंत पोहचवायचं आहे.

आजही अनेक पालकांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजीनिअर झालेले पाहायचे असते. पण जेव्हा विषय संगीत किंवा खेळांचा येतो तेव्हा गणितं बदलतात. हा शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आहे पण एक छंद म्हणून संगीताकडे नक्कीच पाहिले जाऊ शकते. ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला खऱ्या अर्थाने जगवते आणि माणसांशी जोडते.

अनेकदा मी नेहमीचा ठरलेला डबा न पकडता वेगवेगळ्या डब्यात चढतो. मग अनोळखी माणसांमध्ये जाऊन गाणी गायची.. त्यांनाही गायला लावायचं.. आपण फक्त १५ अॉगस्ट आणि २६ जानेवारीलाच देशभक्तीपर गाणी गातो किंवा ऐकतो. मी अनेकदा लोकलमध्ये देशभक्तीपर गाणी गातो आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण करतो. सुट्टीच्या दिवशी गिटार घेऊन बाहेर पडतो आणि बीचवर जाऊन गाणी गातो. लोकांना संगीताचे फायदे सांगतो.. मी यातून कोणताही मोबदला घेत नाही.. अनेकजण मला गाण्यासाठी बोलवतात.. त्याबदल्यात पैसेही देऊ करतात.. मी मात्र पैशांसाठी गात नाही. गाताना जे आत्मिक सुख मिळत त्याची तुलना पैशांतून होऊ शकत नाही.

भविष्यातही मी लोकलमध्ये असाच गात राहीन आणि लोकांना संगीताचे फायदे सांगेन.. तुम्हाला मी कधी डब्यात गाताना दिसलो तर हाक नक्की मारा.. कारण जिना इसीका नाम है..

- मधुरा नेरुरकर

Madhura.Nerurkar@nw18.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading