Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

काही वेळ नसता चहा प्यायला तर काय झालं असतं.. ट्रेन महत्वाची की चहा.. प्रत्येकजण तिच्या या सवयीला शिव्या देत होते. इतक्यात तिचा फोन आला..

  • Share this:

मुंबई, 29 मे- माणसांना कशाचंही व्यसन असू शकतं. एखादी व्यक्ती मला दारू सिगरेटचं तर व्यसन नाही ना.. फार फार तर दिवसभरात १० १२ कप चहा कॉफी होते. त्याहून जास्त तर काही नाही ना.. असं सहज सांगतात. याच पठडीतली माझी मैत्रीण आहे. मी अपर्णा डे तुम्हाला याच मैत्रीणीचा एक भन्नाट किस्सा सांगणार आहे. तो वाचून तुम्हालाही प्रश्न पडेल की असं कोणी असतं का..

एकदा आम्ही सर्व मित्र मैत्रिणी नाशिकला एकत्र जात होतो. तसं मुंबई नाशिकमधलं अंतर तीन ते चार तासांच. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे सीेएसटीला भेटलो. माझी ती मैत्रीणही ऑफीस करून सीेएसटीला पोहोचली होती. घाईत निघाल्यामुळे तिला चहा पिता आला नव्हता. त्यामुळे तिने गाडी सुटण्यापूर्वी पटकन चहा पिऊन येते असा हट्ट धरला. अनेकांनी तिला ट्रेनमध्ये चहा पी असं सांगितलंही. पण, ट्रेनमधला चहा चांगला नसतो... तो प्यायलासारखाही वाटत नाही अशी कारणं ती देत होती.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एवढ्या वर्षाच्या सवयीमुळे आम्हा साऱ्यांनाच हे माहीत होतं की, ती चहा पिऊनच शांत बसेल. तिने कोचमध्ये बॅग ठेवली आणि चहा घेऊन पटकन येते असं सांगत ती धावत टी- स्टॉल शोधायला गेली. माझा एक मित्र दरवाज्यावर उभं राहून ती नजरेच्या टप्प्यात आहे की नाही ते पाहत होता. दिसता दिसता ती गायब झाली. आम्ही तिला लगेच फोन केला.

लवकर ये.. गाडी कधीही सुटेल.. असं म्हणायला आणि गाडी सुटायला.. आम्हाला वाटलं आता तिला ही ट्रेन काही मिळणार नाही.. गाडी सुटतेय हे दिसताच तिने फोन कट केला आणि धावत होती.. आम्ही सगळे आपआपल्या जागेवर बसून तिला आणि तिच्या चहाला शिव्या देत होतो. काही वेळ नसता चहा प्यायला तर काय झालं असतं.. ट्रेन महत्वाची की चहा.. प्रत्येकजण तिच्या या सवयीला शिव्या देत होते. इतक्यात तिचा फोन आला..

'ट्रेनमध्ये आहे.. एसी कोचमध्ये चढलेय. चहाचा स्टॉल कुठे दिसत नव्हता तर स्टेशनच्या बाहेर गेले आणि टपरीवर चहा घेतला. तुझा फोन आला तेव्हा कळलं की ट्रेन सुटतेय.. धावत आपल्या कोचपर्यंत येणं शक्य नव्हतं. मग तिकडेच एसी कोच होता, चढलेय आता. टॉयलेटमध्ये लपून बसलेय. कर्जत आलं की येते. गाडी थांबली की माझ्यासाठी कर्जतचा वडापाव आणि चहा घेऊन ठेवा..' या तिच्या स्पष्टीकरणानंतर आम्ही काहीच बोललो नाही. ती कर्जतपर्यंत टॉयलेटमध्ये बसून आली आणि आम्ही तिची आमच्या कोचमध्ये चहा घेऊन वाट पाहत होतो.

हेही वाचा-

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: May 29, 2019, 10:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading