Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

अवघ्या काही सेकंदात माश्यांच्या पाण्याचा दर्प सगळीकडे पसरला होता. सगळ्यांनी त्या महिलांकडे एक कटाक्ष टाकला होता.

  • Share this:

मुंबई, 27 मे- मी शरद जाधव राहणारा दहिसरचा. मुंबईत कुठेही फिरायचं असलं तरी मी सहसा बाइकनेच जाण्याला प्राधान्य देतो. पण त्या दिवशी मला चर्चगेटला जायचं होतं म्हणून मी ट्रेनने जाण्याचं ठरवलं. तिथलं काम पूर्ण करून मी परत विरार फास्ट लोकल पकडली. दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी फारशी नव्हती. प्रत्येकजण निवांत बसून आपआपल्या कामात व्यग्र होतं. चर्चगेटवरून गाडी सुटणार इतक्यात पुरुषांच्या डब्यात कोळी महिलांचा घोळका चढला. त्याच्याकडे मोठ्या माशांच्या टोपल्या होत्या. बहुधा त्या मासे विकून आपल्या घरी परतत होत्या. त्यांच्या टोपलीत फार कमी मासे शिल्लक होते. सर्वसाधारणपणे त्या मालडब्यात चढतात. पण बहुधा ट्रेन सुटत होती म्हणून त्या पटकन पुरुषांच्या डब्यात चढल्या.

त्या जशा डब्यात चढला पूर्ण डब्यातल्या लोकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अवघ्या काही सेकंदात माश्यांच्या पाण्याचा दर्प सगळीकडे पसरला होता. सगळ्यांनी त्या महिलांकडे एक कटाक्ष टाकला होता. त्या महिलांनाही सगळ्याची सवय झाली असावी म्हणून त्यांनीही याकडे फार लक्ष दिलं नाही. पण या सगळ्यात कोपऱ्यात बसलेल्या एका जोडप्याला तो दर्प सहन होत नव्हता. त्यांनी आपल्या नजरेने महिलांना ही गोष्ट जाणून देण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने त्या महिलांनाही या गोष्टी कळल्या. त्यांनी मोठ्या आवाजात सर्वांना कळू जाईल या आवाजात बोलायला सुरुवात केली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ट्रेन फक्त चांगले कपडे घालणाऱ्यांची आणि इंग्रजी बोलणाऱ्यांची नाहीये. त्यांना जसा माश्यांचा दर्प सहन होत नाही, तसं त्यांनाही लोकांच्या या नजरा आवडत नाहीत. प्रत्येकजण आपल्या पोटापाण्याचा विचार करतो. मासे विकणं यावर त्यांचं आयुष्य आहे. तुम्ही खात असाल किंवा नसाल पण किमान अशा नजरेने एखाद्याकडे सातत्याने पाहणं योग्य नाही.

त्यांचं हे बोलणं बहूधा त्या जोडप्याला थोडंफार पटलं असेल. त्यांचं हे बोलणं बहूधा त्या जोडप्याला थोडंफार पटलं असेल. त्यांनीही नंतर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या सगळ्याला थोडा वेळ गेला असेल इतक्यात त्या महिलांपैकी एकीने माशांच्या टोपलीतलं पाणी ट्रेनच्या बाहेर फेकलं. ते पाणी रुळांवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या अंगावर पडलं. त्या पाण्याने तो पुरता भिजला होता. हे नेमकी त्या जोडप्याने पाहिलं. मग काय त्यांना ती महिला किती चुकीची होती हे सांगण्याची आयती संधीच मिळाली. एखाद्याच्या निष्काळजीपणाची शिक्षा त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला मिळाली होती. माश्यांच्या पाण्याचा वास घेऊन तो कर्मचारी दिवसभर राहणार होता. जोडप्याने त्या कोळिणीला तिने केलेली कृती किती चुकिची होती याची जाणीव करून दिली. तिलाही ते पटलं.

या सगळ्यात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, परिस्थिती बदलली की आधी बरोबर असलेला माणूसही चुकू शकतो. प्रत्येकाच्या वागण्यानुसार आणि त्या स्थितीवर कोण योग्य अयोग्य ते ठरतं. या प्रसंगात अगदी काही वेळात चुकीची वाटणारी व्यक्ती बरोबर वाटू लागली आणि जिच्याबद्दल दया वाटावी तिचा राग येऊ लागला.

हेही वाचा-

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....


Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिलेLife In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेलीLife In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलंLife In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलंLife In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळलाLife In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाहीLife In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतातLife In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोलाLife in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितलीLife in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केलेLife in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसबLife In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेलाLife In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2019 10:44 AM IST

ताज्या बातम्या