Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

सर्वसामान्यपणे एखादा चोर पकडला गेला तर तो दुसऱ्या दिवशी त्याच ट्रेनमध्ये चढत नाही. शिवाय अनेकांच्या सकाळच्या ट्रेनच्या वेळा या ठरलेल्या असतात.

  • Share this:

मुंबई, 8 मे- मुंबईच्या ट्रेनचं जगभरात अप्रुप असतं. मुंबई दर्शनला परदेशातून आलेला माणूस एकदा तरी सीएसटीवर जाऊन किंवा चर्चगेटला जाऊन फोटो काढतोच. मुंबईच्या ट्रेनमधून प्रवास नाही केला तर काय केलं असंच सारे मुंबईच्या बाहेरून आलेल्या प्रवाशांना बोलतात. काहींना या ट्रेनच्या प्रवासाच स्वतःची स्वप्न सापडतात. तर काही फक्त त्या गर्दीचा एक भाग होतात. मी गौरव रणधीर ट्रेनने प्रवास करणारा हजारोंपैकी एक. पण त्या दिवशी ट्रेनमध्ये एक असा प्रसंग पाहिला ज्याने माझी माणसांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली.

बोरिवलीहून चर्चगेटला जाणारी मी ट्रेन पकडली. गर्दीची वेळ असल्यामुळे डब्यात मुंगी शिरायलाही जागा नव्हती. स्लो ट्रेन होती. सांताक्रुझ आलं असेल न नसेल तोच डब्यात आरडा ओरडा सुरू झाला. नंतर कळलं की एक माणूस पाकीट मारण्याचा प्रयत्न करत होता. हे जेव्हा इतरांना कळलं तेव्हा साऱ्यांनी दिवसभरातला.. काही दिवसांचा... महिन्याचा राग त्याच्यावर काढल्याप्रमाणे त्या व्यक्तीला बेदम मारायला सुरुवात केली. दोन- तीन मिनिटं झाली असतील नसतील तोच गर्दीतला एक मुलगा जोर जोरात ओरडून इतर प्रवाशांना त्यांना न मारण्याची विनंती करत होता.

तो मुलगा गहिवरुन सांगत होता की त्या माणसाला सोडा नाही तर तो मरेल... सुरुवातीला त्याचं कोणी ऐकलं नाही पण नंतर खार स्टेशन आल्यावर त्या पाकिटमाराला उतरवण्यात आलं आणि त्यासोबत तो मुलगाही उतरला. दोन्ही व्यक्ती उतरल्यानंतर संपूर्ण डब्यात तो पाकिटमार किती चालू होता आणि त्या मुलाचं मन किती नाजूक होतं याचीच चर्चा सुरू होती. या घटनेकडे माझं इतरवेळी लक्ष गेलं नसतं. पण हीच गोष्ट दुसऱ्या दिवशीही त्याच ट्रेनमध्ये त्याच माणसासोबत घडली. त्यामुळे ती माझ्या लक्षात राहिली. सर्वसामान्यपणे एखादा चोर पकडला गेला तर तो दुसऱ्या दिवशी त्याच ट्रेनमध्ये चढत नाही. शिवाय अनेकांच्या सकाळच्या ट्रेनच्या वेळा या ठरलेल्या असतात. प्रत्येकजण आपल्या ऑफिस, कॉलेजला जाण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या वेळेची ट्रेन पकडतात.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्यामुळे आम्हीही त्या पाकीट चोराला ओळखलं आणि त्याला पुन्हा आज या डब्यात येऊन पुन्हा चोरी केल्याची हिंम्मत केल्याबद्दल अजून चार जास्त फटके मारले. आश्चर्य म्हणजे यावेळीही त्या माणसाला मारण्यापासून बचावणारा मुलगा डब्यात उभा होता आणि त्याला न मारण्याची विनंती करत होता. शेवटी न राहून एकाने विचारलं की तुला का या माणसाचा पुळका आहे? तर मुलाने अगतिक होऊन उत्तर दिलं की ते माझे बाबा आहेत. त्याचं हे बोलणं ऐकून त्या मारणाऱ्यांचे हात थांबले आणि त्यांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्न चिन्ह दिसलं.

यावेळी तो मुलगा म्हणाला की, 'बाबांना ते काय करतात ते कळत नाही. दर दिवशी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो पण दरम्यान ते असं काही करतात ज्याने लोकांचा रोष ओढावून घेतात. चोरी करण्याचा त्यांचा काही हेतू नसतो. पण आता त्यांच्या आजारामुळे ते तसं करत आहेत.' मुलाचं ते बोलणं आणि त्याची कळकळ पाहून अनेकांना आपण उगाच या माणसाला मारलं अशी भावना निर्माण झाली आणि त्या बाप- लेकाला त्यांच्या इच्छूक स्थानकावर उतरू दिलं. मी तो क्षण आजपर्यंत विसरू शकलो नाही.

हेही वाचा-

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: May 8, 2019, 10:26 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading