Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

ट्रेनमध्ये इतरांचं निरीक्षण करणं कमी आणि मोबाइलमध्येच डोकं जास्त असतं. मी अतुल दुबल, मला अजूनही लोकांचं निरीक्षण करण्याची सवय आहे.

  • Share this:

मधुरा नेरुरकर,मुंबई, 1 मे : लोकलमधला दररोजचा प्रवास तुम्हाला काही ना काही शिकवत असतो. तुम्ही जर लक्ष देऊन प्रत्येकाकडे पाहिलं आणि त्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला नवनवीन गोष्टी दिसतील. त्यांच्या प्रत्येक हावभावातून तुम्हाला अनेक गोष्टी आपसूक कळतात. पण हल्ली इतरांचं निरीक्षण करणं कमी आणि मोबाइलमध्येच डोकं जास्त असतं. मी अतुल दुबल, मला अजूनही लोकांना पाहण्याची...त्यांचं निरीक्षण करण्याची सवय आहे. म्हणूनच की काय मी एक अशी गोष्ट पाहिली जी इतरांच्या नजरेतून सुटली.

मी ठाण्यावरून सीएसटीला प्रवास करत होतो. दुपारचा प्रवास होता, त्यामुळे गर्दी फारशी नव्हती. प्रत्येक प्रवासी आपल्याच विश्वात होता. काही जण वाचत होते, अर्ध्याहून अधिक जण मोबाइममध्येच पाहत होते. इतक्यात माझ्या समोर एक कुटुंब येऊन बसलं. त्या मुलीचं वय दोन ते तीन वर्ष असेल. थोडावेळ ती काहीच बोलली नाही. पण नंतर बहुधा तिला एका जागी बसून कंटाळा आला असले म्हणून ती वळवळ करू लागली. नवरा- बायको त्यांच्या गप्पांच्या विश्वास एवढे बुडाले होते की, मुलीला कंटाळा आलाय तिच्याकडे पाहावं हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. एव्हाना ती मुलगी रडायला लागली होती.

तिचं रडणं थांबवण्यासाठी आईने पर्समधली शेंगदाण्याची पुडी काढून तिच्या हातात दिली आणि ती पुन्हा गप्पा मारू लागली. मुलगीही थोडावेळ शांत होऊन शेंगदाणे खाऊ लागली. एक- दोनजण स्शेश गेल्यावर डब्यात हिजडे चढले. त्यांच्या नेहमीच्या कामाप्रमाणे ते पैसे मागायला लागले. काही जण त्यांना पैसे देत होते तर काही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते.

सुरुवातीला त्यांना पाहून ती मुलगी जरा दचकली. पण ते सगळ्यांकडे जाऊन काही ना काही मागत आहेत आणि लोकंही त्यांना देत आहेत हे त्या मुलीनं कदाचित हेरलं असेल. तो हिजडा जसा तिच्याजवळ आला त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या आई- बाबांकडे पैसे मागितले. त्यांनी काही पैसे दिले नाहीत. म्हणून तो छक्का पुढच्या लोकांकडे पैसे मागण्यासाठी वळणार इतक्यात त्या मुलीने आपल्या शेंगदाण्याच्या पुडीतले दोन- तीन शेंगदाणे काढून दिले.

तो क्षण माझ्या मनात इतका खोलवल रुतला गेला आहे की तो कधीच विसरला जाऊ शकत नाही. तिची ही कृती पाहून त्या हिजड्यालाही धक्का सुखद बसला. त्याने मुलीला भरभरून आशीर्वाद दिले आणि तिने दिलेले ते दोन शेंगदाणे तिच्याचसमोर खाऊन तो पुढे निघून गेला. ती मुलगीही तिचे उरलेले शेंगदाणे खाण्यात गर्क झाली आणि तिचे आई- बाबा तर आधीच गप्पा मारण्यात व्यग्र होते.

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

या संबंधीत आणखी बातम्या इथे वाचा-

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ऐन गर्दीत ते कपल पुरुषांच्या डब्यात चढलं आणि...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: May 1, 2019, 11:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading