Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

तो दरवाजाच्या कडेला अंग आखडून उभा होता पण चुकून डब्यात चढल्यावर त्या पुरुषाने भारतातला सर्वात भयंकर गुन्हा केला याप्रमाणे महिलांनी त्याच्याकडे पाहिलं.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 02:24 PM IST

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

मुंबई, १२ एप्रिल- कसं असतं ना.. समानतेचे धडे आपण लहानपणापासून शिकत असतो. सर्वधर्म समानता, स्री- पुरुष समानता वगैरे अनेक गोष्टी आपण आपल्यापरिने या सर्व गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. पण मला (स्वप्निल संसारे) नेहमीच हा प्रश्न पडतो की2हे नियम मुंबई लोकलमध्ये विसरले जातात का?

एरव्ही मी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नसतं, पण एका घटनेमुळे मला हा प्रश्न पडला ज्याचं उत्तर आजही मिळालं नाही.

मी गोरेगाव स्टेशनला बोरिवली ट्रेन पकडण्यासाठी उभा होतो. दरम्यान एक विरार स्लो लोकल आली. उगाच गर्दीत का चढा असा विचार करत मी ती ट्रेन सोडून देण्याचं ठरवलं. नेहमीप्रमाणे ही विरार ट्रेनही खच्चून भरलेली होती. महिलांच्या डब्बा त्यातल्या त्यात थोडा रिकामी होता पण पुरूषांच्या डब्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती. ट्रेन सुटणार इतक्यात ३५ ते ४० वर्षांचा एक माणूस ट्रेन पकडण्यासाठी धावत होता. इतक्यात ट्रेन सुरू होणार होती. ट्रेन सुटणार या भितीने तो अनावधानाने महिलांच्या डब्यात चढला.

चुकून डब्यात चढल्यावर त्या पुरुषाने भारतातला सर्वात भयंकर गुन्हा केला याप्रमाणे महिलांनी त्याच्याकडे पाहिलं. तो दरवाजाच्या कडेला अंग आखडून उभा होता आणि त्यांना सतत सांगतही होता की मी पुढच्या स्टेशनवर उतरून पुढच्या पुरुषांच्या डब्यात जाईन. पण महिलांच्या डब्यात चढण्याचा अक्षम्य गुन्हा त्याच्याकडून झाला होता.

तो सतत विनवण्या करत होता की त्याला पुढच्या स्टेशनपर्यंत उभं राहू दे.. पण महिलांनी त्याला असं काही फैलावर घेतलं आणि तो किती असभ्य आहे आणि तो मुद्दाम महिलांच्या डब्यात कसा चढला याचा पाठ त्याला समजवायला लागले. एखाद मिनिटाच्या या प्रकारानंतर त्या माणसाला अपमानीत करून अखेर त्याला गोरेगाव स्टेशनला उतरवण्यात महिलांना यश आलं. दरवाज्यावर उभ्या असलेल्या त्या महिलांच्या चेहऱ्यावर क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्या माणसाबद्दल बोलायचे तर त्याला ती ट्रेन सोडावीच लागली.

Loading...

मला नेहमीच प्रश्न पडतो की, महिलांच्या डब्यात ऐनगर्दीत फेरीवाले चढतात त्यांना महिला कशा येऊ देतात. फक्त ती मुलं महिलांच्या आवडीच्या गोष्टी विकतात म्हणून त्यांना डब्यात प्रवेश मिळतो का? पण मग एखादा सुशिक्षीत चुकून डब्यात चढला तर त्याचा गाजावाजा का केला जातो. त्याच्याकडून कोणतं नुकसान होणार होतं. पुरुषांच्या डब्यात चढताना महिलांना हे उपदेश आठवत नाहीत का? मलाही वाटतं की महिलांच्या डब्यात पुरुषांनी चढू नये. पण एखादा चुकून चढला तर त्याचं एवढं भांडवल करणं खरंच योग्य आहे का हाच माझा प्रश्न आहे.

- मधुरा नेरुरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...