Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू असताना अमित सार्दळचं लक्ष समोर बसलेल्या मुलाकडे गेलं. तो त्यांच्याकडे एकटक पाहत होता. सुरुवातीला अमितने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर त्याची ती नजर अमितला डिस्टर्ब करायला लागली होती.

  • Share this:

मुंबई, 13 मे- दरदिवशी मुंबईच्या ट्रेनमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. डहाणूपासून ते चर्चगेटपर्यंत, कर्जत कसारापासून सीएसटी पर्यंत आणि पनवेलपासून सीएसटीपर्यंत दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरातच असली पाहिजे. यात प्रत्येक स्तरातला, स्वभावाचा माणूस प्रवास करतो. या प्रवासादरम्यान येणारे अनुभव ही भन्नाट असतात. काही अनुभव हे चेहऱ्यावर हसू आणतात तर काही संताप.

दुर्देवाने मी अमित सार्दळ घेतलेला अनुभव हा संताप आणणाराच होता. भायखळ्यावरून बदलापूरला जाण्यासाठी आम्ही निघालो. रात्री ८ वाजताची ट्रेन होती. तसं पाहायला गेलं तर रात्री ८ चा ट्रेनमधला प्रवास फार उशीरा मुळीच नसतो. ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. पुरुषांच्या डब्यात गर्दीचा फायदा घेणारे काही कमी नसतात हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण काही वेळा या सर्व गोष्टींचा एवढा त्रास होतो की त्याचा मानसिक परिणाम अनेकांवर होतो.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घरी जाताना मी सेकण्ड क्लासमध्ये माझ्या मित्रासोबत बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू असताना माझं लक्ष समोर बसलेल्या मुलाकडे गेलं. तो आम्हा दोघांकडे एकटक पाहत होता. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर त्याची ती नजर मला डिस्टर्ब करायला लागली होती. तो माझ्यासोबत असलेल्या मुलाकडे पाहून अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न करत होता.

माझ्या मित्राने आणि मी त्याला याबद्दल फटकारलं तेव्हा त्याने काही वेळ इकडे तिकडे पाहिलं. पण नंतर पुन्हा पालथ्या घड्यावर पाणीच.. मला त्याच्या नजरेतली वासना कळत होती. अखेर आम्ही त्याला ओरडायला सुरुवात केली आणि संपूर्ण डब्यात त्याच्या कृतीबद्दल सांगितले. पण या सगळ्यात तो मुलगा एवढा धीट होता की, आम्हालाच तो खोटं पाडत होता. अखेर आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यापद्धतीने आम्ही स्टेशनवरील पोलिसांना त्याच्या अश्लील कृतीबद्दल सांगितले आणि त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यास सांगितले.

आमची तक्रार ऐकून ते म्हणाले की, अशा लोकांविरुद्ध फार काही करता येत नाही. फार फार तर त्यांना समज देता येतो. अशांना तुरुंगात टाकता येत नाही. त्यांनी सांगितल्यानुसार त्या मुलाला समज दिला आणि सोडून दिले. आमच्या समोरून जाताना तो मुलगा जग जिंकल्याच्या आनंदात आणि तुम्ही माझं काहीच वाईट करू शकणार नाही या आविर्भावात निघून गेला. आम्ही मात्र हतबल होऊन पुढच्या ट्रेनची वाट पाहत राहिलो.

हेही वाचा-

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: May 13, 2019, 10:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading