News18 Lokmat

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

टीसी येणार नाही या आत्मविश्वासात आम्ही ट्रेन पकडली होती आणि नेमकी तेव्हा एका टीसीने आम्हाला पकडलं.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 01:29 PM IST

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

मुंबई, २१ मे- ट्रेन आणि मुंबईकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकीशिवाय दुसरी अपूर्ण आहे. दररोज लाखोजण या ट्रेनला कधी उशीरा आली म्हणून तर कधी वेळेत आली म्हणून शिव्या घालत असतात. तर कधी

अनेक वर्ष ट्रेनमधली मैत्री टिकवून ठेवली म्हणून काहीजण ट्रेनचं कौतुकही करतात. पण या सगळ्यात ती मात्र कोणतीच गोष्ट मनाला लावून न घेता अविरत पुढे जात असते. या प्रवासात नानाविध अनुभव घेत ती न थांबता सतत धावत असते. मी प्रतिक सावंत माझ्यासोबत ट्रेनमध्ये घडलेला असाच एक भन्नाट किस्सा तुम्हाला सांगणार आहे.

साधारणपणे रात्री १० च्या सुमारास आम्ही ठाण्यावरून दादरला जायला गाडी पकडत होतो. माझ्यासोबत माझे दोन मित्रही होते. हे सांगणं योग्य आहे की नाही माहीत नाही पण आम्ही तेव्हा रात्र झाली म्हणून तिकीट न काढण्याचा निर्णय घेतला. माझ्या एका मित्राने मला पाठिंबा दिला तर दुसरा म्हणाला की, किमान पास नाहीये तर तिकीट तरी काढा. त्याने आमची शाळा घ्यायला सुरुवात केली. तुमच्यासारखे असतात ज्यांच्यामुळे आपण पुढे जात नाही... तुमच्यासारख्या शिक्षित लोकांनी असं केलं तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करणार असे एक ना अनेक गोष्टी आम्हाला सुनवायला लागला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

Loading...

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तो आम्हाला एवढं बोलला की नंतर आम्हालाच आमची लाज वाटू लागली. टीसी येणार नाही या आत्मविश्वासात आम्ही ट्रेन पकडली होती आणि नेमकी तेव्हा एका टीसीने आम्हाला पकडलं. मग काय आम्ही त्यांना दंड भरला. त्यांनीही आम्हाला अनेक गोष्टी सुनावून दाखवल्या. तो आम्हाला ओरडत असताना माझा मित्र शांतपणे ऐकत होता.

त्याचं बोलणं खरं ठरलं असंच आम्हाला वाटत होतं. तिकीट काढण्याचा कंटाळा म्हणून आपण काउंटरपर्यंत गेलोच नाही आणि उगाचचीच बदनामी झाली. आमच्याकडून दंड घेतल्यानंतर टीसीने माझ्या त्या मित्राकडे तिकीट विचारलं. तो एकही शब्द बोलला नाही आणि त्याने खिशात हात घालत दंडाचे पैसे दिले. टीसीही त्याला पावती देऊन एकही शब्द न बोलता सरळ निघून गेला. आम्ही त्याच्याकडे पाहतच राहिलो. हा तोच मुलगा होता जो ठाणे ते दादर आम्हाला तुमच्यासारखे लोक तिकीट काढत नाही म्हणून असं होतं... तसं होतं... असं लेक्चर देत होता पण मुळात त्याच्या स्वतःकडेच तिकीट नव्हतं. आम्हाला जेव्हा हे कळलं तेव्हा तुम्हाला कल्पना आलीच असेल की आम्ही त्याच्यासोबत काय केलं असेल...


हेही वाचा-


Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...