Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

काहींनी तर शिल्पा पिसाटला मारायला छत्र्याही काढल्या होत्या. एकीने तर तिच्या डोक्यात मारलेही. त्यांचं ते रुप पाहून शिल्पाला रडूच कोसळलं होतं. एवढी क्रुरता कुठून येते असा प्रश्न तिला पडला होता.

  • Share this:

मुंबई, 15 मे- मी शिल्पा पिसाट माझ्यासोबत ट्रेनमध्ये घडलेला अशी घटना घडली की त्यानंतर मी विरार ट्रेनमधून प्रवास करायलाच घाबरायचे. पुढची अनेक वर्ष मी विरार- वसई ट्रेनमधून प्रवासच केला नाही. अगदी आताही जर या ट्रेनमधून प्रवास करायचा असेल तर मी दुपारच्या वेळेत करते. कारण मी घेतलेला अनुभव माझ्या कॉलेजच्या दिवसांमधला आहे. आता तर मुंबईची गर्दी अजून वाढली आणि दुसऱ्यांना समजून घेण्याची मानसिकता तर जवळपास संपुष्टातच आली.

साधारणपणे १५ वर्षांपूर्वी मी चर्नीरोडला कामाला जायचे. कॉलेज करताना नोकरीही करायचे. शिक्षण आणि नोकरी ही तारेवरची कसरत करताना जीव आधीच मेटाकुटीला यायचा. २४ तासही तसे मला कमीच पडायचे. पणअसे एकत्र करत असल्याने मला वेळ ही कमीच पण कितीही उशीर झाला किंवा लवकर जायचं असलं तरी मी विरार ट्रेन कधीच पकडायचे नाही.

त्यादिवशी मी ऑफिसमधून रोजच्यापेक्षा उशीरा सुटले. १५ वर्षांपूर्वी मोबाइल सगळ्यांकडेच असायचा असं नाही. चर्नीरोड स्टेशनला आले तेव्हा इंडिकेटरवर बोरिवली ट्रेन दिसली. धावत जाऊन ती ट्रेन पकडली. हळू हळू गर्दी वाढू लागली. आज अचानक बोरिवली ट्रेनला एवढी गर्दी कशी या विचारात मी होते इतक्यात दादर आलं. दादरमध्ये तर एवढ्या महिला चढल्या की त्या डब्यात श्वास घ्यायलाही जागा उरली नाही. ट्रेनमधल्या महिलाही वेगळ्याच वाटत होत्या. मला जागा मिळाल्यामुळे मी निवांत बसले होते. पण तेवढ्यात उभ्या असलेल्या एका महिलेने माझ्या बाजूच्या महिलेले ती कुठे उतरणार असं विचारलं. ती नालासोपारा असं म्हणाली. तिचं ते उत्तर ऐकून मीही चपापले. मी तिला म्हटलं की ही तर बोरिवली ट्रेन आहे. त्यावर त्यांनी मलाच सांगितलं की दादरला या ट्रेनचं इंडिकेटर विरार असं होतं. कदाचित त्यांनी गाडी बदलली असेल.

झालं.. ती गर्दी आणि ट्रेनच्या मध्ये उभ्या असलेल्या त्या महिलांकडे पाहून माझा धीर खचत चालला होता. मी अंधेरी स्टेशन यायच्याआधीच उठले आणि दरवाज्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. बोरिवली नाही तर किमान कांदिवलीला तरी मला उतरू देतील असं मला वाटत होतं. मी प्रत्येकीला त्यांना कुठे उतरायचं आहे हे विचारत पुढे जात होते. अर्ध्या अधिक जणींना दहिसर आणि मिरा रोडला उतरायचं होतं. त्यासाठीच त्या दरवाज्यावर उभ्या होत्या. मी त्यांना मला बोरिवली उतरायचं असून पुढे जायला द्या असं सांगत होते. पण त्यातली एकही बाई माझं बोलणं ऐकून घेत नव्हती.

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी विनंती करत होते आणि इंडिकेटर बदललं त्यामुळे मी या ट्रेनमध्ये चढले असंही मी त्यांना सांगितलं पण कोणालाही ते खरं वाटलं नाही. मी जीवाचा आटापिटा करून दरवाज्याच्या पॅसेजमध्ये पोहचले पण मला हे कळून चुकलं होतं की, मी दरवाजापर्यंत जाऊ शकत नाही. किंबहूना या इतर महिला मला जाऊ देणार नाहीत. मी विनंती करत असताना मागून एक आवाज आला, बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... बोरिवलीला फेकून द्या तिला... ढकलून द्या.. काहींनी तर मला मारायला छत्र्याही काढल्या होत्या. एकीने तर माझ्या डोक्यात मारलेही. त्यांचं ते रुप पाहून मला रडूच कोसळलं होतं. एवढी क्रुरता कुठून येते असा प्रश्न मला पडला होता. बोरिवली ट्रेनमधली एखादी मुलगी विरार ट्रेनमध्ये चढली तर त्यात एवढं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही.

बोरिवली येऊन गेलेही मला मुद्दाम उतरू दिलं गेलं नव्हतं. त्यातल्या एका बाईला माझी दया आली आणि तिने मला विरुद्ध दिशेने भाईंदरला उतरण्याचा सल्ला दिला. मला दहिसर मिरा- रोडलाही त्या बायका उतरू देणार नव्हत्या. शेवटी त्या महिलेच्या मदतीने मी भाईंदरला उतरले. तिनेच मला स्टेशनला उतरल्यावर पाणी दिलं आणि बोरिवलीकडे जाणाऱ्या स्लो ट्रेनमध्ये बसवून दिलं. शिवाय तिच्या मोबाइवरून माझ्या घरी फोन करून थोड्यावेळात मी सुखरूप पोहोचेन असंही सांगितलं. ती एक घटना मी आजपर्यंत विसरू शकले नाही आणि पुढेही विसरेन असं वाटत नाही.

हेही वाचा-

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ऐन गर्दीत ते कपल पुरुषांच्या डब्यात चढलं आणि...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

 

 

First published: May 15, 2019, 11:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading