Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

अनेक वर्ष निवृत्तीचे दिवस मोजण्यात त्यांनी घालवले, पण शेवटचे सात दिवस त्यांना कधी संपूच नयेत असं झालं होतं.

  • Share this:

मुंबई, 31 मे- मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दररोज होणारी भांडणं जेवढी प्रसिद्ध आहेत, तेवढीच प्रसिद्ध इथली मैत्री आहे. शाळा कॉलेजमधल्या मैत्री प्रमाणेच इथली मैत्री निर्मळ असते. वर्षांनूवर्ष टिकणारी असते. मी निखील वराडकर अनेकवर्ष ट्रेनमधून प्रवास करतोय, यात मी करिअरच्या सुरुवातीपासून ट्रेनमध्ये सुरू झालेल्या मैत्रीला रिटायरमेन्टपर्यंत टिकलेली पाहिली आहे. तरुणाईचा ट्रेनमधला विरंगुळा ते रिटायरमेन्टचे दिवस मोजणारा ग्रुपही मी पाहिला. या सगळ्यात एक प्रसंग कायम माझ्या मनावर कोरला गेला.

माझी बोरिवलीहून चर्चगेटला जाणारी नेहमीची ट्रेन आहे. यात माझा स्वत:चा असा कोणता ग्रुप नसला तरी माझ्या डब्यात एक असा ग्रुप होता ज्यात २५ वर्षांची एक दोन मुलं, मध्यमवयीन पुरूष आणि अगदी दोन दिवसांनी रिटायर होणारे काकाही होते. या ग्रुपची खासियत म्हणजे एकदा का ट्रेन सुरू झाली की, जोरात गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आणि नंतर जुनी गाणी गायला सुरुवात करायची.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवीन पिढीच्या मुलांना त्या गाण्यात फारसं स्वारस्य नसायचं. ते नेहमीच नवीन गाणी गाण्याची मागणी करायचे. पण मग नवीन गाणी जुन्या पिढीला येत नसल्यामुळे त्यांचं फारसं कोणी ऐकायचं नाही. पण शेवटी ती नवीन पिढीच सगळं ऐकेल असं नाही ना.. त्यातल्या काहींनी गाण्यांचे बोल प्रिन्ट आउट काढून आणले. शेवटी काही दिवस नवीन गाणी आणि काही दिवस जुनी गाणी गायची असा नियम त्यांनी केला.

नवीन गाण्याचा दिवस आला की ग्रुपमधली सर्वात जुनी मंडळी गाणी गाण्यात फारसा उत्साह दाखवायची नाही. एकतर त्यांना नवीन गाणी माहीतच नव्हती आणि वाचून गावं असे त्याचे बोलही नव्हते. यावरून अनेकदा ते काका मुलांना सुनवायचेही.. 'हल्लीच्या गाण्यात तो भाव नसतो जो जुन्या गाण्यांमध्ये असतो... एकदा शांतपणे ही गाणी ऐका मग तुम्हाला यातला भाव कळेल.' नवीन मुलांना यात काही स्वारस्य नव्हतं.

अखेर ग्रुपमधल्या एका काकांची निवृत्ती अगदी एका आठवड्यावर येऊन ठेपली. अनेक वर्ष निवृत्तीचे दिवस मोजण्यात त्यांनी घालवले, पण शेवटचे सात दिवस त्यांना कधी संपूच नयेत असं झालं होतं. प्रत्येकजम त्यांना उर्वरीत आयुष्य आनंदात, मनोसोक्त जगण्याचा सल्ला देत होते. पण, गेली ४० वर्ष एकाच ठिकाणी केलेली नोकरी, तिकडचे चांगले वाईट अनुभव, मित्र- परिवार यांना सोडून जाण्यासाठी त्यांचं मन धजावत नव्हतं. शिवाय ट्रेनमधली मैत्रीही संपणार या विचाराने ते अस्वस्थ होते. आता ही नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

ट्रेनमधले हास्य- विनोद आता उर्वरीत आयुष्यात नसणार हा विचारच त्यांना आतल्या आत पोखरून काढत होता. त्यांच्या मनावरचं हे ओझं कमी करण्यासाठी त्यांच्या ऑफिसच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण ग्रुपने ट्रेनचा तो डब्बा सजवला होता. प्रत्येकाने काही भेटवस्तूही आणल्या होत्या शेवटी सरप्राइज म्हणून सगळ्यांनी बोरिवली ते चर्चगेटपर्यंतचा प्रवास भक्त त्यांची जुनी गाणी गातच केला होता. त्यांच्या ग्रुपमधल्या २५ ते २६ वयाच्या मुलांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट पाहून काकांचा ऊर भरून आला आणि गेल्या ३० ते ३५ वर्षांत ते रडले नसतील तेवढे ते सर्वांना मिठी मारून रडले...

हेही वाचा-

Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2019 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading