JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Life In लोकल- फाटक्या कपड्याच्या बाईने पैशांची ती बॅग उचलली आणि...

Life In लोकल- फाटक्या कपड्याच्या बाईने पैशांची ती बॅग उचलली आणि...

बहुतेकवेळा महिला त्या गोष्टींकडे पाहतही नाहीत आणि दुर्लक्ष करतात. कल्याणी पौंक्षेचंही अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्षच होतं. पण त्या दिवसाने तिला एक धडा दिला जो कधीही विसरता येण्यासारखा नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून- मी राहायला दादरला आणि कामानिमित्त अंधेरीला जाते. ट्रेनचा उलटा प्रवास करत असल्यामुळेही मला कधी गर्दी मिळाली नाही. पण अनेकदा ट्रेनमध्ये महिलांची पिशवी, बॅग काही ना काही राहिलेलं असतंच. बहुतेकवेळा महिला त्या गोष्टींकडे पाहतही नाहीत आणि दुर्लक्ष करतात. मीही काही वेळा लक्ष गेलं तर पाहते आणि अनेकदा दुर्लक्षच होतं. पण त्या दिवसाने मला एक धडा दिला जो मी कधीच विसरू शकत नाही. त्याचं झालं असं की, मी दादरला ट्रेनमध्ये बसले आणि थोड्या वेळाने कळलं की, एका बाईला ५०० रुपयांचं बंडल असलेली एक बॅग मिळाली. सुरुवातीला तिने ही बॅग कोणाची आहे ते विचारलं. पण तिथे बसलेल्यापैकी कोणाचीच नसल्यामुळे कोणीतरी आपली बॅग विसरून गेली हे साऱ्यांच्या लक्षात आलं. खरं सांगायचं तर ते बंडल पाहून अनेकांना हे बंडल आपणं घेऊ शकलो असतो तर असा प्रश्न नक्कीच मनात आला असेल. यात चूक आहे की नाही यापेक्षा हा एक मानवी स्वभाव आहे याच पद्धतीने याकडे पाहावं. बॅगमध्ये कोणाचं नाव, कार्ड काही मिळतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काहीच नव्हतं. काही मेडिकल बिलं होती आणि रुग्णालयाचे पेपर होते. शेवटी करायचं तरी काय असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आला. विशेष म्हणजे ज्या महिलेला ती बॅग मिळाली त्या महिलेने जर ते पैसे घेतले असते तर तिचे काही आर्थिक समस्या नक्कीच सुटल्या असत्या हे तिच्याकडे पाहून नक्कीच कळत होतं. -——————————————————————————————————————————————————– Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज… कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ———————————————————————————————————————————————————- मला वाटत होतं की, ती महिला बॅग आपल्याचकडे ठेवेल. पण तिने ती बॅग विलेपार्ले स्टेशनला उतरून पोलिसांच्या ताब्यात दिली आणि परत ट्रेनमध्ये येऊन बसली. त्या महिलेचे कपडे मळलेले होते आणि ती सधन कुटुंबातील नसेल हे तिच्या एकंदरीत पेहरावावरून वाटत होतं. अशावेळी जर अचानक पैशांनी भरलेली बॅग मिळाली तर त्या व्यक्तीसाठी दिवाळीच असेल असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. पण तिने असं काहीच केलं नाही. ती ट्रेनमध्ये चढल्यावर मी तिला कुतूहलाने विचारलं की तिने असं का केलं? यावर बोलताना ती म्हणाली की, ‘खरं सांगायचं तर माझ्याही डोक्यात पैशांबद्दल विचार आला होता. पण औषधांचा कागद पाहिला आणि वाटलं, एखाद्याने त्याच्या आजारासाठी जमा केलेले पैसे घेऊन आपण काय करणार. पांडुरंग पाहतोय.. माझं काय चाललंय ते चाललंय वाईट काही नाही आणि उत्तमही काही नाही.’ तिच्या त्या वाक्यांनी मला काही क्षणासाठी माझीच लाज वाटली. या पैशांच्या बॅगेचं काय हा प्रश्न मला आणि तिथे बसलेल्या अनेक महिलांना पडला होता. पण जिला ही बॅग मिळाली होती तिच्या मनाला हा प्रश्न शिवलाही नव्हता.. नक्की कोण शिक्षीत होतं हाच प्रश्न मला तेव्हा पडला होता. हेही वाचा- Life In लोकल- ती मुलगी ट्रेनमध्ये आईसाठी भांडता भांडता बेशुद्ध पडली Life In लोकल- जरा लवकर निघालो असतो तर… L ife In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून… Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि… Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने… Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि…. Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि…. Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली… ढकलून द्या तिला… Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून… Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं… Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील…’ Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो…’ Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं… Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले Life In लोकल- ‘तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत…’ Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’ Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही? Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात… Life In Local- …जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १) Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २) Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३) Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि… Life in लोकलः …आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले Life in लोकलः ‘मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय…’ Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि… Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट… Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या