मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला मेंदूही कमी वयात वृद्धत्वाचा बळी ठरू शकतो. तुमच्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच मेंदूचेही कालांतराने वय होणे स्वाभाविक आहे. मात्रा तुमचा आहार आणि जीवनशैलीदेखील तुमच्या मेंदूच्या वयाच्या दरावर परिणाम करू शकते. काही सवयी मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करू शकतात. तर काही त्यास गती देऊ शकतात. आपण अनेकदा आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करतो. ज्यामुळे मेंदूची वृद्धत्वाची प्रक्रिया वाढते.