इतर सॅनिटरी वस्तूंपेक्षा जास्त सुरक्षित: बाजारातील बहुतेक पॅड आणि टॅम्पोन्समध्ये घातक रसायनं आणि कृत्रिम पदार्थ असतात जे स्त्रीच्या जननेंद्रियाच्या संवेदनशील त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतात. शिवाय यामुळे योनीच्या पीएचमध्ये व्यत्यय येऊ शकतो. चांगल्या दर्जाचे मेन्स्ट्रुअल कप हे वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेले असतात. त्यामुळे योनीच्या नियमित पीएचला किंवा जननेंद्रियाच्या नाजूक त्वचेला त्रास होत नाही.