जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / स्मिथच्या धावबादवरून वाद; इंग्लंडचा गोलंदाज म्हणाला, मला पंचांनी सांगितलेलं की,...

स्मिथच्या धावबादवरून वाद; इंग्लंडचा गोलंदाज म्हणाला, मला पंचांनी सांगितलेलं की,...

स्मिथच्या धावबादवरून वाद; इंग्लंडचा गोलंदाज म्हणाला, मला पंचांनी सांगितलेलं की,...

स्टिव्ह स्मिथलासुद्धा आपण बाद झालो असं वाटलं होतं. पॅव्हेलियनच्या दिशेने काही पावलंही चालला. तर इंग्लंडने विकेट मिळाल्याचा जल्लोष सुरू केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

एजबस्टन, 29 जुलै : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या धावबाद होण्यावरून झालेल्या वादावर आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने खुलासा केला आहे. पंच कुमार धर्मसेना यांनी धावबादच्या निर्णयासंदर्भात सांगितलं होतं की, जर जिंग बेल्सचा वापर केला गेला असता तर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद दिलं असतं. एशेस २०२३च्या पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथच्या धावबादवरून बराच वाद झाला. जॉनी बेअरस्टोने स्टम्पवरून बेल्स उडवल्या नाहीत त्यामुळे थर्ड अंपायर नितिन मेनन यांनी स्टिव्ह स्मिथला नाबाद ठरवलं. त्यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात ७८ व्या षटकात स्टिव्ह स्मिथने लग साइडला चेंडू मारत दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. त्याने जोरदार धावही घेतली. पण सब्स्टिट्यूट फिल्डर जॉर्ज एलहमने फेकलेला चेंडू थेट बेअरस्टोच्या हातात गेला. त्याने स्टम्प्स उडवल्या. स्टिव्ह स्मिथलासुद्धा आपण बाद झालो असं वाटलं होतं. पॅव्हेलियनच्या दिशेने काही पावलंही चालला. तर इंग्लंडने विकेट मिळाल्याचा जल्लोष सुरू केला. दरम्यान, थर्ड अंपायर नितिन मेनन यांनी काही फ्रेम्स पाहून निर्णय देताना स्मिथला नाबाद ठरवलं. वर्ल्ड कपची तारीख आली समोर, 20 संघ, दोन देशात स्पर्धा; भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये? स्टुअर्ट ब्रॉडने या मुद्द्यावर बोलातना म्हटलं की, मी प्रामाणिकपणे सांगतो की नियम माहिती नाहीत. मला वाटतं की, नॉट आऊट देण्यासाठी अस्पष्ट असं होतं. त्यामुळे benifit of doubt सारखं वाटत होतं. पहिले अँगल पाहिल्यानतंर मला वाटलं की आऊट आहे. तर दुसरे अँगल पाहिल्यानतंर वाटलं की बेल्स उडाल्या आहेत. ब्रॉड म्हणाला की, पंच कुमार धर्मसेना यांनी मला सांगितलं की, जर इथं जिंग बेल्स असत्या तर आऊट दिलं असतं. खरंतर मला याचं कारण कळलं नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २९५ धावा करत इंग्लंडवर १२ धावांची आघाडी मिळवली. स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक ७१ धावा केल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २८३ धावा केल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात