जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पैशांसाठी नाही काही; उतारवयात भरपावसात समोसा विकणाऱ्या या आजोबांची बातच आहे निराळी

पैशांसाठी नाही काही; उतारवयात भरपावसात समोसा विकणाऱ्या या आजोबांची बातच आहे निराळी

फोटो - ट्विटर

फोटो - ट्विटर

भरपावसात रस्त्यावर समोसा विकण्याचं या आजोबांनी सांगितलेलं कारण थक्क करणारं आहे.

  • -MIN READ Rajasthan
  • Last Updated :

अजमेर, 29 जुलै : कुणी बिझनेस करतं, कुणी कंपनीत नोकरी करतं, कुणी रस्त्यावर चहाची टपरी टाकतं, तर कुणी वडापाव-समोसा विकतं… प्रत्येक व्यक्ती काम करते, कष्ट करते, मेहनत करते ते पोट भरण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. पण एक असे आजोबा जे रस्त्यावर समोसा आणि पोहे विकत आहेत. पण ते पैशांसाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी. त्यांनी जे सांगितलं ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते काही कमी नाहीत. पण उतारवयातही असं काम करणारे हे आजोबा चर्चेत आले आहेत. जे भरपावसातही रस्त्यावर गरमागरम समोसे आणि पोहे विकत आहेत. एका व्यक्तीने त्यांना पाहिलं. या वयात इतक्या पeसात काम करण्याची काय गरज आहे. आराम करायचा, असा सल्ला देणाऱ्या एका व्यक्तीसह सर्वांनाच त्यांनी आयुष्याचा एक धडा दिला. आपण हे काम पैशांसाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. Oh So Sweet! 94 वर्षांची आजी बनली सर्वात Cutest Barbie; VIDEO पाहून सांगा तुम्हाला कशी वाटली? या व्यक्तीने या आजोबांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचा हा किस्सा सांगितला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ही व्यक्ती म्हणाली, “राजस्थानच्या उदयपूरच्या रस्त्यावर दिसलेले हे आजोबा. या व्यक्तीने “मी माझ्या कारमध्ये कोर्ट सर्कल उदयपूरजवळून जात होतो. तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. तिथं मला एक वृद्ध काका गरम समोसे आणि पोहे देताना दिसले. त्यांना पाहताच माझ्या मनात एक विचार आला की त्यांची काही गरज असावी. मी त्यांच्या जवळ गेलो आणि विचारलं की आज इतक्या पावसात तुम्ही आराम का केला नाही? त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकल्यानंतर माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला” Viral News : नोकरी नाही, घरी बसून कंटाळला, व्यक्तीनं केलं असं काही की पोलिसही चक्रावले या व्यक्तीनं सांगितलं की ते आजोबा त्याला म्हणाले, “बेटा, मी पैशांसाठी एवढी मेहनत करत नाही. मी फक्त माझ्या मनाला आनंद देण्यासाठी काम करतो. घरी एकटं बसण्यापेक्षा इथं बसणं चांगलं. माझ्याकडील पदार्थ खाल्ल्यावर चार लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहतो तेव्हा माझं मलाही आनंद होतं, त्यांचे आनंदी चेहरे पाहिल्यावर मन प्रसन्न होतं”

जाहिरात

या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची कमेंट आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात