जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूरमधल्या पावसानं मोडला 29 वर्षांचा रेकॉर्ड, 24 तासांमध्ये रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप, Video

नागपूरमधल्या पावसानं मोडला 29 वर्षांचा रेकॉर्ड, 24 तासांमध्ये रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप, Video

नागपूरमधल्या पावसानं मोडला 29 वर्षांचा रेकॉर्ड, 24 तासांमध्ये रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप, Video

नागपूर शहराला बुधवारी रात्री दमदार पावसानं अक्षरशः झोडपून काढले. या पावसानं 29 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर 27 जुलै :  नागपूर शहराला बुधवारी रात्री दमदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मध्यरात्रीच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार एन्ट्री केल्यानं नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील अनेक सखोल भागात पाणी साचले तर काही वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार गेल्या 24 तासात 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री पासून नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विमानतळ येथे 164 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, पारडी या भागात 179.7 मिमी आणि सीताबर्डी भागात 177.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या पाण्यामधून वाट काढावी लागते आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नागपूर शहरासह ग्रामीण भागातून वाहणाऱ्या नदी नाल्यांना उधाण आले आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला आहे. संततधार पावसामुळे हिंगणा तालुक्यातील हनुमान नगर परिसर जलमय झाला आहे. पावसाचा फटका बसलेल्या भागात नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला ही पाचारण करण्यात आले. या पथकानं पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविलं आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो नागपूरकरांना कायम उत्सुकता  असलेला अंबाझरी तलाव बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अखेर ओव्हरप्लो झाला आहे. ओसंडून वाहणाऱ्या अंबाझरी तलाव बघण्यासाठी बघ्यांची सकाळपासून एकच गर्दी झाली आहे.  यापूर्वी झालेल्या पावसामुळे तलावात पाणी साचले होते मात्र ते ओव्हरफ्लो होण्यासाठी पुरेसे नव्हते. कुठे शाळा बंद तर कुठे घरांमध्ये शिरलं पाणी, मुसळधार पावसानं उडाली दाणादाण पावसानं मोडला रेकॉर्ड बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. यादरम्यान 164 मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 29 वर्षात पहिल्यांदाच नागपूर शहर किंवा जिल्ह्यात आठ तासांत एवढा पाऊस पडला आहे.यापूर्वी 1994 मध्ये जुलै महिन्यात 303 मिली मीटर पाऊस पडला होता नागपूर शहरातील वर्धमान नगर, शांती नगर, पारडी, भरतवाडा, शिवशंभू नगर, मनीष नगर, नरेंद्र नगर, सूर्या नगर, एच.बी. शहर इत्यादी भागांना पावसाचा फटका बसला आहे.गुरुवारी सकाळपासून पावसाने उसंत दिल्यामुळे पाऊस थांबला पाणी ओसरत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्याच्या काही भागात तीव्र आणि मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेसह आजचा ऑरेंज अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात