advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'चेहऱ्यावर सूज, वाढलेलं वजन...' गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री; 3 वर्षांपासून मिळालं नाही काम

'चेहऱ्यावर सूज, वाढलेलं वजन...' गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री; 3 वर्षांपासून मिळालं नाही काम

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'जागतिक हिपॅटायटीस दिना'च्या निमित्ताने तिने, ती गेल्या ३ वर्षांपासून ऑटो 'इम्यून हिपॅटायटीस'शी झुंज देत असल्याचा खुलासा केला आहे.

01
छोट्या पडद्यावरून अनेक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सना मकबूल. 'खतरों के खिलाडी 11'मध्येही ती सामील झाली होती.

छोट्या पडद्यावरून अनेक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सना मकबूल. 'खतरों के खिलाडी 11'मध्येही ती सामील झाली होती.

advertisement
02
पण त्यानंतर सना अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. 2021 पासून तीने कुठल्याच प्रोजेक्टमध्ये काम केलं नाही. चाहत्यांना तिच्याविषयी काळजी वाटत होती. आता अखेर सोनाने यामागचं कारण सांगितलं आहे.

03
सना मकबूलने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, "मला काहीतरी शेअर करायचे आहे जे खूप वैयक्तिक आहे. मी एक ऑटोइम्यून हिपॅटायटीस रुग्ण आहे आणि मला 2020 मध्ये याचं निदान झालं. मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या या आजाराचा प्रवास कठीण आहे."

04
सना मकबूल पुढे म्हणाली, "सर्वात चांगली गोष्ट 2021 मध्ये घडली, जेव्हा मी 'खतरों के खिलाडी'साठी गेले होते, तेव्हा माझ्यावर ट्रीटमेंट चालू होती. मला वाटलं मी सगळं काही करू शकते, पण तसं नव्हतं."

05
सना मकबूल म्हणाली, "तुमच्या आयुष्यात जेव्हा सर्व काही ठीक चाललं असतं तेव्हाच काहीतरी वाईट घडतं. माझ्याही बाबतीत असच काहीसं घडलं. जेव्हा माझ्या करिअरचा सर्वोत्तम काळ सुरु होता तेव्हाच मला ब्रेक घ्यावा लागला.'

06
सना मकबूल पुढे म्हणाली, "गेले दीड वर्ष खूप कठीण गेले आहे. मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या खूप थकले आहे. खूप काम गमावले आहे. लाल चेहरा, सुजलेले पाय, सुजलेले हात आणि वाढलेले वजन. सर्व काही मला त्रास देत आहे. एक अभिनेत्री म्हणून माझी अवस्था काय असेल हे तुम्ही चांगलंच समजू शकता"

07
सना मकबूलने व्हिडिओच्या शेवटी सांगितले की, तिची तब्येत सुधारत आहे. ती म्हणाली, “मी या सर्व गोष्टींचा सामना केला आणि पुन्हा चांगली ठणठणीत बरी झाले. आज जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करू इच्छिते की मी F3-F4 रुग्ण होते आणि आता मी F1-F2 मध्ये पोहोचले आहे. खूप चांगली सुधारणा होत आहे. आता, मी माझे काम पुन्हा सुरू करण्यास तयार आहे कारण मी तुमच्याप्रमाणेच निरोगी आणि सामान्य आहे."

08
सना मकबूलने 2014 मध्ये  'दिक्कुलु चुडाकू रामय्या'द्वारे तेलुगू चित्रपटातुन इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर तिने 'रंगून' या चित्रपटात देखील काम केलं. सना 2009 पासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • छोट्या पडद्यावरून अनेक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सना मकबूल. 'खतरों के खिलाडी 11'मध्येही ती सामील झाली होती.

    MORE
    GALLERIES