मुंबई, 29 जुलै- महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनं काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. शोनं जरी ब्रेक घेतला असला तरी चाहते मंडळी या शोला नेहमीच मिस करताना दिसत होते. नेहमीच सर्वांचा एक प्रश्न होता की, हा शो कधी सुरू होणार. आता सर्व चाहते मंडळींसाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच हा शो भेटीला येणार आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल कधी आणि किती वाजता. या शोबद्दल आता एक मोठी अपडेट सुरू आली आहे. काही महिन्यांपुर्वी महाराष्ट्राची हास्यजत्राने ब्रेक घेतला होता.स्वतः हास्यजत्रेतील कलाकारांनी याविषयी माहिती दिली होती. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोच्या जागी KBC शो सुरु आहे. आता 14 ऑगस्ट पासुन महाराष्ट्राची हास्यजत्रा सर्वांच्या भेटीला येणार आहे. वाचा- धबधब्याच्या काठीच आकाशनं मांडली चूल; निसर्गाच्या सानिध्यात बनवला ‘हा’ खास पदार्थ महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या ब्लॅक अँड व्हाईट प्रोमोत दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात दिसत आहेत. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार! ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत… पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ - सहकुटुंब हसू या! असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलायमहाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे कलाकार अमेरिका दौऱ्यावर गेले होते. अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधील कलाकारांनी खळखळुन हसवलं. या शोमधील कलाकार परदेशा वारीचे फोटो व काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.