जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / JioBook लॅपटॉप लाँचची तारीख ठरली; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

JioBook लॅपटॉप लाँचची तारीख ठरली; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

JioBook लॅपटॉप लाँचची तारीख ठरली; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

JioBook लॅपटॉप लाँचची तारीख ठरली; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

रिलायन्स जिओ लवकरच सर्वसामान्यांना परवडेल असा लॅपटॉप लाँच करणार आहे. रिलायन्स जिओ लॅपटॉप हा गेल्या ऑक्टोबरमध्ये लाँच झालेल्या JioBook ची अद्ययावत आवृत्ती असू शकते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    काही वर्षांपूर्वी प्रामुख्यानं आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप असायचे. मात्र, वाढलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चर आणि ऑनलाईन शिक्षणामुळे लॅपटॉपला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. परिणामी, लॅपटॉप खरेदी-विक्रीमध्ये वाढ झाली आहे. वाढती मागणी लक्षात घेता अनेक कंपन्यांनी ग्राहकांना परवडतील अशा प्रकारचे विविध लॅपटॉप बाजारात आणले आहेत. त्यामध्ये रिलायन्स जिओचाही समावेश आहे. रिलायन्स जिओ लवकरच सर्वसामान्यांना परवडेल असा लॅपटॉप लाँच करणार आहे. असं म्हटलं जात आहे की, या लॅपटॉपच्या लाँचिंगनंतर डेल, लिनोवोसारख्या ब्रँड्सना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कारण, रिलायन्सचा लॅपटॉप खूप कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. रिलायन्स जिओ लॅपटॉप हा गेल्या ऑक्टोबरमध्ये लाँच झालेल्या JioBook ची अद्ययावत आवृत्ती असू शकते. टिपस्टर अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, JioBook लॅपटॉपचा टिझर अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. यामध्ये लॅपटॉपच्या लाँच डेटचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण, तो ‘युवर अल्टिमेट लर्निंग पार्टनर’ या टॅगलाईनसह सूचीबद्ध करण्यात आलेला आहे. असा अंदाज बांधला जात आहे की, 31 जुलै रोजी JioBook लॅपटॉप लाँच केला जाऊ शकतो. या आधी 2022 मध्ये, JioBook लॅपटॉप भारतात 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला होता. नवीन लॅपटॉपची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, अशी शक्यता आहे. हा लॅपटॉप रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून खरेदी करता येईल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    नवीन JioBookची स्पेसिफिकेशन्स : नवीन JioBook लॅपटॉप अत्यंत पातळ आणि वजनाला हलका असेल. त्याचं वजन सुमारे 990 ग्रॅम असेल. लॅपटॉपमध्ये दीर्घ काळ टिकणारी बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. यात 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले आणि व्हिडिओ कॉलसाठी 2-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. लॅपटॉप Qualcomm Snapdragon 665 SoC सपोर्टसह येईल. यात 2GB रॅम आणि 32GBC स्टोरेज मिळेल. हे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवणं शक्य आहे. जिओ लॅपटॉप JioOS वर चालतो आणि 5000mAh सह तो ऑफर केला जाऊ शकतो. व्यक्तीच्या घरातून 30 कोटी रुपयांची ब्रँडेड घड्याळं जप्त; DRI च्या तपासात धक्कादायक माहिती उघड JioBook लॅपटॉप कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरसह सादर केला जाऊ शकतो. हा लॅपटॉप निळ्या रंगात उपलब्ध मिळेल. शिवाय त्यात 4G कनेक्टिव्हिटी असेल. यामध्ये पॉवरफुल ऑक्टा-कोअर प्रोसेसर असेल. या लॅपटॉपमध्ये हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, मल्टिटास्किंग आणि लेटेस्ट सॉफ्टवेअर्स वापरता येतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात