जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी पंख्यात लपवला कागद, चिठ्ठी पाहून एटीएसलाही धक्का

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी पंख्यात लपवला कागद, चिठ्ठी पाहून एटीएसलाही धक्का

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांच्या घऱात धक्कादायक गोष्टी

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांच्या घऱात धक्कादायक गोष्टी

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून एटीएसला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 29 जुलै : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून एटीएसला काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. एटीएसला युनुस साकी आणि इम्रान खानच्या घरात सिलिंग फॅनमध्ये लपवलेल्या कागदामध्ये हाताने लिहिलेली बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असलेला कागद सापडला आहे. याशिवाय एटीएसला अॅल्युमिनियम पाईप, बल्बचा फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्याही सापडल्या आहेत. याप्रकरणी सीमाब काझी या 27 वर्षीय तरुणाला मंडणगडहून अटक करण्यात आली आहे. कोंढव्यामध्ये सीमाब काही दिवसांपूर्वी आई आणि भावाला घेऊन शिक्षणासाठी राहिला होता. पुणे एटीएसने कोथरूडला पकडलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी रत्नागिरीमधून एकाला अटक केली आहे, त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान आणि मोहम्मद युनुस साकी यांना 23 जुलैला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीवरून अब्दुल कादीर दस्तगीर याला या दोघांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर आता चौथ्या संशयितालाही अटक करण्यात आली आहे. पुणे दहशतवादी प्रकरण : नावाला भूलतज्ञ डॉक्टर पण तरुणांना ओढायचा ISIS च्या जाळ्यात, करायचा ब्रेनवॉश मुंबईतील सुरक्षा वाढवली दरम्यान मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील छबड हाऊस येथील सुरक्षा वाढवली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छबड हाऊसची गुगल इमेज, राजस्थानमध्ये हल्ल्याची योजना आखण्यासाठी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्याकडे छबड हाऊसची गुगल इमेज मिळाली. ही माहिती महाराष्ट्र एटीएसने मुंबई पोलिसांना दिली, त्यानंतर लगेच इथली सुरक्षा वाढवण्यात आली. अटक करण्यात आलेले दोघंही राजस्थानच्या रतलामचे रहिवासी असून ते सध्या महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर एनआयएने पाच लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. हे दोघं आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात