जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Bhuvneshwar Kumar : वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा 'गेम चेंजर' करणार निवृत्तीची घोषणा, नेमकं काय बिनसलं?

Bhuvneshwar Kumar : वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा 'गेम चेंजर' करणार निवृत्तीची घोषणा, नेमकं काय बिनसलं?

Bhuvneshwar Kumar : वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा 'गेम चेंजर' करणार निवृत्तीची घोषणा, नेमकं काय बिनसलं?

Bhuvneshwar Kumar Retirement News : युवा खेळाडूंना संघात संधी दिली जात आहे. वरिष्ठ खेळाडूंना टीम इंडियातून वगळले जात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू, बॉलर आणि हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध बॉलर लवकरच निवृत्तीबाबत घोषणा करणार असल्याचे त्याने स्वत: संकेत दिले आहेत.  यंदाच्या आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी आणि नंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसणार आहे. युवा खेळाडूंना संघात संधी दिली जात आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळले जात आहे. असे काही जुने खेळाडू आहेत ज्यांना टीममध्ये गेल्या काही मॅचला संधी देण्यात आली नाही. आज टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन भारतीय क्रिकेटर असा उल्लेख काढला आहे. त्यामुळे तो लवकरच निवृत्तीची घोषणा करुन शक्यतो असा कयास लावला जात आहे.  33 वर्षीय स्टार गोलंदाजाने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम BIO वरून भारतीय क्रिकेटपटूला काढून टाकले. भुवनेश्वरच्या इन्स्टा बायोमध्ये, आधी बायो ‘भारतीय क्रिकेटर’  असं ठेवलं होतं आता ते हटवल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

अर्जुननं धरली विराट कोहलीची वाट; इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो भुवनेश्वरने जानेवारी 2022 मध्ये पार्ल इथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्याने 8 ओव्हरमध्ये एकही विकेट घेतली नव्हती. तेव्हापासून दुखापत आणि खराब फॉर्ममुळे एकही सामना खेळू शकला नाही किंवा त्याला संधी देण्यात आली नाही.

कोहली ‘विराट’ विक्रमापासून एक पाऊल दूर; सचिन, जयसूर्याला टाकणार मागे एका अहवालानुसार, भुवनेश्वर कुमार भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. आर अश्विन लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे असंही कयास आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात