GST fraud in Agra: सेंट्रल जीएसटी आणि सेंट्रल एक्साइजच्या टीमने आग्रामध्ये 134 कोटींच्या जीएसटी फ्रॉडचा खुलासा केला आहे. टीमने बनावट फर्म्सच्या बिझनेसमध्ये सामिल एका मॉड्यूलची पोलखोल केली आहे. जो मालाचा पुरवठा न करता पावत्या जारी करतो आणि इतरांची नावे वापरून वैयक्तिक चालू बँक खात्यांद्वारे पैसे पाठवतो. यासोबतच अनेक कंपन्यांच्या लेटर हेडवर जारी केलेल्या बनावट पावत्याच्या प्रती, चेकबुक, बँक पासबुक, रबर स्टॅम्प आणि मोबाईल फोनसह अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार अक्षय गोयल याला अटक करण्यात आली आहे. तपासात अक्षयने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मॉडस ऑपरेंडी काय आहे? CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालय, आग्रा यांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, या रॅकेटची मोडस ऑपरेंडी अंतर्गत सुरुवातीला कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि मित्रांचे पॅन आणि आधार क्रमांक वापरून बनावट कंपन्या तयार केल्या जातात. नंतर वस्तूंचा पुरवठा/वाहतूक न करता व्यवहारांचे एक जटिल नेटवर्क तयार केले जाते. संपूर्ण रॅकेट सर्कुलर ट्रेडिंगच्या भोवती फिरते आणि वस्तूंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता वेगवेगळ्या ग्राहकांना त्यांच्या विनंतीनुसार इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) पाठवले जाते. हे मुख्यतः इतर टॅक्सपेयर्सला मालाची कोणत्याही प्रकारची फिजिकल हालचाल आणि पेमेंट न करता, चुकीच्या पद्धतीने आयटीसीचा लाभ घेणे आणि उपयोग करण्याची पगवानगी देते. Cyber Crime : एक मेसेज अन् महिलेचं अकाऊंट रिकामं; ‘अशी’ झाली लाखो रुपयांची फसवणूक मास्टरमाइंड भाड्याच्या घरात राहत होता या मोडस ऑपरेंडीचा मास्टरमाइंड अक्षय गोयल हा बेलागंज तिकोनियाजवळील भैरो बाजार येथील रहिवासी आहे. तो कमला नगर येथे भाड्याने राहत होता. एस्कॉर्टच्या नावाखाली 100 जणांना लुटलं; अल्पवयीन मुलाला लाखाचा गंडा, टोळीचा पर्दाफाश 227 बनावट कंपन्या तयार करून सरकारची 134 कोटींची फसवणूक करण्यात आली केंद्रीय जीएसटी आयुक्त शरद श्रीवास्तव यांनी सांगितले की, हे रॅकेट त्याच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या माध्यमातून बनावट कंपन्या तयार करत होते. याशिवाय हे लोक बनावट बिले विकण्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे. त्यांनी सांगितले की त्यांनी मिळून सुमारे 227 बनावट फार्म तयार केल्या होत्या. या बदल्यात लोखंडी भंगार, सिमेंट, टाइल्स, मार्बल यांसारख्या 755 कोटींहून अधिक किमतीच्या वस्तूंच्या बनावट पावत्या जारी करण्यात आल्या होत्या. सुमारे 134 कोटी रुपयांची बेकायदेशीर आणि अपात्र आयटीसी जारी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.