दिल्ली, 27 जुलै : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा आणि भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू यांची सध्या सोशल मीडियार जास्त चर्चा आहे. पाकिस्तानच्या सीमा हैदरने नेपाळमधून भारतात प्रवेश केला. तर त्यानंतर राजस्थानमध्ये राहणारी अंजू पंजाबमधून पाकिस्तानमध्ये गेली. आता कोरियन मुलगा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी एक दोन नव्हे तर चार वेगवेगळी विमाने बदलून आणि टॅक्सीने १६ हजार किलोमीटर दूर गेल्याचं समोर आलं आहे. २८ वर्षांचा कोरियन यांग सियो त्याची गर्लफ्रेंड लुइजा व्हिटोरिया रिबेरोल हिला भेटण्यासाठी जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला. यांगने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी दक्षिण कोरियातून दक्षिण अमेरिकेपर्यंत चार विमाने बदलली, त्यानंतर १५० मैलांहून अधिक प्रवास टॅक्सीने केला. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, यांग आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे सोशल मीडियावर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. त्याने सोशल मीडियावर त्याची लव्ह स्टोरी शेअर केली. यांगची गर्लफ्रेंड लुइजाने म्हटलं की, मला कोरियन बोलता येत नाही. तर त्याला पोर्तुगालची भाषा येत नाही. त्यामुळे ट्रान्सलेटिंग एपच्या माध्यमातून आम्ही बोलतो. एकमेकांना समजून दोघेही संघर्ष करतायत. नवऱ्याच्या शिक्षणासाठी बायकोनं विकले दागिने, या ‘ज्योती’नं दिली गड्याला खंबीर साथ लुइजाने म्हटलं की, त्याला पोर्तुगालची भाषा शिकायची आहे. आधीपासून काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे. एका इंग्लिश कम्युनिकेशन स्टेजवर दोघांची भेट झाली आणि मित्र बनले. काही महिन्यातच ही मैत्री प्रेमात बदलली. ऑगस्ट महिन्यात डेटसाठी विचारलं आणि आम्ही व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून डेट केलं. लुइजाने सांगितलं की दोन महिन्यांनी यांगने मला दोन महिन्यातच भेटेन असं प्रॉमिस केलं होतं. यांगने दक्षिण कोरियातील जेजू बेटावरून ब्राजीलमधील फोर्टालेजा गाठलं. तिथं पोहोचण्यासाठी एक दोन नाही तर चार वेळा विमान प्रवास केला. तिथून पुढे टॅक्सीने १५० मैल प्रवास करून सेरातील सोबराईत पोहोचला. लुईजाने म्हटलं की, पहिल्यांदा माझा विश्वासच बसला नाही तो येईल. पण तो आला आणि भेटला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.