राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहे. मात्र पक्षात फूट पडली नसल्याचा दावा शरद पवारांनी केलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना त्यावर वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय.