मुंबई, 26 जुलै : जेईई अॅडव्हान्स्ड आणि जेईई मेन या परीक्षांच्या गुणांच्या आधारावर सध्या जोसा (Joint Seat Allocation Authority - JOSAA) आणि सीएसएबी (CENTRAL SEAT ALLOCATION BOARD - CSAB) कौन्सिलिंग सुरू आहे. जेईई मेन आणि अॅडव्हान्स्ड या परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आयआयटी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा एनआयटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. कारण या संस्था नामवंत असल्याने त्यातून पास आउट झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट म्हणजेच उत्तम पॅकेजची नोकरी मिळते. सद्यस्थितीत ‘आयआयटी कानपूर’सह अनेक आयआयटी कॉलेजेसमधले प्रवेश पूर्ण होत आले आहेत. तिथे जागा शिल्लक नसल्याने आता एनआयटी कॉलेजेसचे पर्याय उपलब्ध आहेत. चांगलं प्लेसमेंट रेकॉर्ड असलेल्या एनआयटी कॉलेजेसची माहिती घेऊ या. या बाबतीत प्रयागराजमधल्या मोतिलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MNNIT) या संस्थेचा क्रमांक अव्वल आहे. MNNIT या संस्थेत बीटेकसाठी कोणत्याही शाखेत प्रवेश मिळाला, तर नोकरी पक्की असं समजलं जातं. कारण तिथे प्लेसमेंटचं रेकॉर्ड तब्बल 100 टक्के आहे. NIRF 2023च्या रँकिंगनुसार, MNNIT ही संस्था देशभरातल्या सर्व एनआयटी कॉलेजेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच, ते कॉलेज प्लेसमेंटच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आकडेवारी पाहिली, तर 2021-22मध्ये तिथल्या 382 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट सरासरी 20 लाख रुपयांच्या पॅकेजवर झालं होतं. 114 विद्यार्थ्यांना सरासरी 30 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालं होतं. तसंच, 37 विद्यार्थ्यांना 40 लाखांचं, तर 33 विद्यार्थ्यांना तब्बल 50 लाख रुपये वार्षिक पगाराच्या पॅकेजची ऑफर मिळाली होती. त्या व्यतिरिक्त या कॉलेजातल्या 8 विद्यार्थ्यांना 82 लाख 63 हजार रुपयांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली होती. तसंच, तिथल्या ऋत्विक मान्यम या विद्यार्थ्याला तब्बल एक कोटी 35 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली होती. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या अंकित कुमार कुशवाह याला 55 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे. त्यामुळे प्रयागराजमधल्या MNNIT चं रेकॉर्ड या बाबतीत चांगलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.