जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / एखाद्या बॉम्बपेक्षा कमी नाही तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगला लावून विसरता मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

एखाद्या बॉम्बपेक्षा कमी नाही तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगला लावून विसरता मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

फोनचा स्फोट का होतो?

फोनचा स्फोट का होतो?

एखाद्या बॉम्बपेक्षा कमी नाही तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगला लावून विसरता…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : बऱ्याचदा असं असतं की आपण फोन चार्जिंगला लावून ठेवतो आणि पूर्ण चार्ज झाला तरी काढून ठेवत नाही किंवा विसरुन जातो. मात्र सलग चार्जिंगला जर फोन राहात असेल तर तुम्ही ही चूक करु नका. तुमचा फोन एखाद्या बॉम्बपेक्षाही कमी नाही. याचं कारण गेल्या काही महिन्यांमध्ये फोनमध्ये ब्लास्ट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तुम्हालाही सतत फोन चार्ज करायची किंवा तासंतास चार्जिंगला फोन लावायची सवय असेल तर आजच बदला. यामुळे बॅटरी लवकर खराब होण्याचा धोका असतो. एवढंच नाही तर त्यामध्ये स्फोट होण्याचा देखील धोका असतो.

दिवसातून किती वेळा चार्ज करावा फोन? अर्ध्यापेक्षा जास्त लोक करतात चूक

नवीन आलेल्या टेक्नोलॉजीनुसार स्मार्टफोनमध्ये ऑटोमॅटिक चार्जिंग कटचा पर्याय दिलेला असतो. जेणेकरून तुमचा फोन 100 टक्के चार्ज झाल्यावर तो आपोआप चार्जिंग बंद करेल किंवा ओव्हरचार्ज होणार नाही. जेव्हा ही ऑटोमॅटिक सिस्टम काही कारणास्तव खराब होते, तेव्हा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी खराब होते. स्फोट होतो. म्हणूनच आम्ही तुमच्या स्मार्टफोनला योग्य पद्धतीनं चार्ज करणं आवश्यक आहे. आता बहुतेक स्मार्टफोन्समध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे आणि तो इतका स्मार्ट आहे की मोबाइलची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग आपणच बंद करतो. बॅटरी 90 टक्क्यांपर्यंत पोहोचताच पुन्हा चार्जिंग सुरू होते. या सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्ध फोनमध्ये स्फोट होत असल्याच्या घटना समोर येतच आहेत.

चुकूनही 100 टक्के चार्ज करू नका तुमचा फोन, पाहा काय होऊ शकतं नुकसान

ऑटो चार्जिंग कट सिस्टम खराब होते आणि बॅटरी तिच्या क्षमतेपेक्षा जास्त चार्ज होऊन बॅटरी फुगते तेव्हा स्फोट होण्याचा धोका असतो. ओव्हरचार्जिंगमुळे, बॅटरी एका पॉइंटनंतर फुगायला लागते. या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही चार्ज करताना काळजी घ्या. 20 टक्क्यांवर फोन आल्यावर फोन चार्ज करा. तर फोन 95 टक्क्यांच्या वर चार्ज करु नका असंही तज्ज्ञ सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात