जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IIT, IIM किंवा NIT मधून घेतलं नाही शिक्षण, तरीही मिळालं 1 कोटींहून अधिकच पॅकेज, वाचा पूर्ण कहाणी

IIT, IIM किंवा NIT मधून घेतलं नाही शिक्षण, तरीही मिळालं 1 कोटींहून अधिकच पॅकेज, वाचा पूर्ण कहाणी

IIT, IIM किंवा  NIT मधून घेतलं नाही शिक्षण, तरीही मिळालं 1 कोटींहून अधिकच पॅकेज, वाचा पूर्ण कहाणी

IIT, IIM किंवा NIT मधून घेतलं नाही शिक्षण, तरीही मिळालं 1 कोटींहून अधिकच पॅकेज, वाचा पूर्ण कहाणी

तुम्हाला अशाच एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्याने कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये न शिकता देखील 1 कोटींहून अधिकच्या पॅकेजची नोकरी मिळवली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जगभरातून अनेक कंपन्या दरवर्षी लाखो, कोटींचे पॅकेज देऊन भारतीय कॉलेजमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देत असते. यामध्ये आयआयटी, आयआयएम किंवा एनआयटी हे कॉलेज तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांमुळे खूपच प्रसिद्ध आहे. परंतु इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या क्षमतेच्या जोरावर लाखो कोटींच्या पॅकेजवर नोकऱ्या मिळतात. आम्ही तुम्हाला अशाच एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्याने कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये न शिकता देखील 1 कोटींहून अधिकच्या पॅकेजची नोकरी मिळवली आहे. अनुराग माकडे असे पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून अनुरागला अमेझॉनमध्ये 1.25 कोटींच्या पॅकेजवर प्लेसमेंट मिळाली आहे. अनुरागने आयआयटी, आयआयएम किंवा एनआयटी अश्या मोठ्या कॉलेजमधून शिक्षण घेतले नसून त्याने अलाहाबादच्या  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधूनमाहिती तंत्रज्ञानात बी टेक पदवी घेतली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आयआयटी अलाहाबादमधील अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या लागल्या असून ५ विद्यार्थ्यांनी १ कोटीहून अधिक रकमेचे पॅकेज घेतले आहेत. अनुराग माकडे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून त्याने लिंक्डइनवर पोस्ट करत त्याच्या सक्सेसबद्दल सांगितले आहे. अनुराग आता फ्रंट एंड इंजीनियर म्हणून अमेझॉनमध्ये जॉईंट झाला आहे. अनुराग शिवाय अलाहाबाद आयआयटीचा विद्यार्थी प्रथम गुप्ता याला गुगलकडून 1.4 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात