शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवार का उभा केला नाही याबाबत मंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे....
कुख्यात गुंड गज्या मारणेला पोलिसांनी साताऱ्यातून बेड्या ठोकल्या आहेत. गज्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्यापासून तो फरार होता. पण त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे....
जळगावात शिवसेनेचं संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना थेट इशाराच दिला आहे....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य केलं आहे....
अभिनेता सुबोध भावे यांनी आज राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपण पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिलेल्या फिल्मवर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती, अशी माहिती दिली....
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर आपली भूमिका मांडली आहे....
शिवशाही बस बोरिवली ते सातारा असा प्रवास करत होती. या दरम्यान पाषाण-सुस रोडवर बसचा ब्रेक फेल झाल्याने संबंधित घटना घडली. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
नालासोपाऱ्यात एका पतीने पत्नीची हत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात सतत भांडणं सुरु होती, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नालासोपारा शहर हादरलं आहे....
महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण राज्यात आजच्या घडीला शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचं एकत्रित सरकार आहे. राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा ग्रामपंचायत निवडणुकीत खरंच परिणाम होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. ...
वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव या 6 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. ...
गुलाबराव पाटील सध्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी ते सर्वोतोपरी मेहनत करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...
राज ठाकरे यांनी अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी घडतंय हे स्पष्ट झालंय. पण या भेटीमागे नेमकं कारण काय होतं ते मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्ट करण्यात आलं आहे. ...
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सोनिया यांना पायी न चालता गाडीत बसून यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी सोनिया यांच्या बुटाची लेसही बांधल्याचं दृश्य बघायला मिळालं होतं. सोनिया यांनी आपल्या लेकराच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिल्याचं बघायला मिळालं. पण राहुल यांच्या बहीण प्रियंका नेमक्या कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. त्याचंच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत....
राज ठाकरे वर्षा बंगल्याबाहेर निघत होते अगदी त्या क्षणाच्या अवघ्या काही काळाआधी वर्षा गायकवाड या 'वर्षा' बंगल्याच्या आवारात प्रवेश करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ...
राज्याच्या राजकारणात तीन महिन्यांपूर्वी मोठा भूकंप घडला होता. त्यानंतरही राजकीय घडामोडी या सुरुच आहेत. कारण मनसे नेत्यांकडून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर काही प्रमाणात टीकेची झोड उठवली जात असताना आज वेगळंच घडलं. ...
समता पक्ष नेमका कुणाचा आहे जो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हाला विरोध करत आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. आम्ही याच समता पक्षाची माहिती आज तुम्हाला देणार आहोत....
भिवंडीत चार जणांवर वीज कोसळल्याची दुर्देवी घटना घडलीय. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे....