नितीन नांदुरकर, जळगाव, 16 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्य शिवसेना आणि त्यांच्या गटात संघर्ष सुरु आहे. राज्यभरातील शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून केला जातोय. विशेष म्हणजे याच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना थेट इशाराच दिला आहे. शिवसैनिकाला धमकी दिली तर जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा संजय सावंत यांच्याकडून देण्यात आला आहे.
"तुम्ही जर जिवंत आईचं दूध प्यायला असाल तर माझ्या फोनवर धमकी देऊन बघा, जे ठिकाण सांगाल तिथे उभा राहून तुमच्याशी दोन हात नाही केले तर बाळासाहेबांचा शिवसैनिक नाव लावणार नाही. धमकी आम्हालाही देता येते. आम्ही केवळ धमकी देणार नाही. तर यापुढचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही", असा इशारा संजय सावंत यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे. ते जळगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
'...तर तुम्हाला जिल्ह्यात फिरु देणार नाही', शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांना मोठा इशारा, पाहा VIDEO #ShivSena #GulabraoPatil #MaharashtraPolitics pic.twitter.com/PWROVrIMJL
— News18Lokmat (@News18lokmat) October 16, 2022
संजय सावंत नेमकं काय म्हणाले?
"कुणाला कोणत्या केसमध्ये अडकवायचं, आज मी या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एक सांगतो की, हे सर्व प्रकार थांबवा. आणि जर हे प्रकार थांबले नाहीत, धमकी द्यायचा प्रयत्न केला. तुमच्या कुणामध्ये हिंमच असेल तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतोय. तुम्ही तुमच्या जिवंत आईचं दूध प्यायला असाल एक तरी धमकी मला फोनवर देऊन दाखवा. तुम्ही जे ठिकाण सांगाल तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून उभा राहिलो नाही आणि एकाचे दोन हात केले नाहीत तर शिवसैनिक म्हणून लावणार नाही", असा इशारा संजय सावंत यांनी दिला.
(काल मुख्यमंत्र्यांची भेट, आज फडणवीसांना पत्र, नंतर राज ठाकरे म्हणतात, 'सगळीकडे ओरबाडणं सुरुय')
"कुणालाही धमकी देऊ नका. धमकी आम्हाला सुद्धा देता येते. ज्यादिवशी आम्ही धमकी देऊ, त्यावेळी आम्ही फक्त धमकीवर थांबणार नाहीत. त्याच्यापुढचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. जे काही कराल ते सुखाने करा. पण शिवसैनिकाच्या केसाला धक्का जरी लागला तर तुम्हाला जिल्ह्यात फिरु देणार नाही हे लक्षात ठेवा", असं संजय सावंत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Shiv sena