जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / इथे ओशाळलं नातं, चारित्र्याच्या संशयावरुन पतीचं टोकाचं पाऊल, नालासोपारा हादरलं

इथे ओशाळलं नातं, चारित्र्याच्या संशयावरुन पतीचं टोकाचं पाऊल, नालासोपारा हादरलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

नालासोपाऱ्यात एका पतीने पत्नीची हत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात सतत भांडणं सुरु होती, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नालासोपारा शहर हादरलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नालासोपारा, 16 ऑक्टोबर : स्त्रीच्या आयुष्यात तिचा पिता आणि पतीचं महत्त्व अनन्यसाधारण असं असतं. पती म्हणजे महिलेचा आत्मा आणि आयुष्य असतो. महिला आपल्या पतीवर विसंबून असते. पती म्हणजे तिचं सर्वस्व असतं. पती-पत्नीचं नातं एकमेकांशिवाय अपूर्ण असतं. या नात्याला विश्वासाची जोड मिळाली तर पती-पत्नी त्यांच्या आयुष्यात गगनभरारी घेऊ शकतात. ते सुखाने आयुष्य जगू शकतात. आयुष्यात हवं ते मिळवू शकतात. पण या नात्यात विश्वास जरुरी असतो. या नात्यामध्ये विश्वास नसला तर नको असलेल्या अनपेक्षित घटना घडतात. घरात सारखा वाद होतो, वादातून भांडणं होतात, एकमेकांची मनं दुखावली जातात. हा वाद कोणत्या टोकाला जाऊ शकतो याची कल्पना देखील आपण करु शकत नाही. त्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला शिकायला हवं. मुख्य म्हणजे जोडीदारावर विश्वास ठेवायला हवा. संयम दाखवायला हवा. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त सकारात्मकतेने आयुष्य जगायला शिकायला हवं. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे नालासोपाऱ्यात घडलेली एक बिभत्स दुर्देवी घटना. नालासोपाऱ्यात एका पतीने पत्नीची हत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात सतत भांडणं सुरु होती, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नालासोपारा शहर हादरलं आहे. पती आपल्या पत्नीसोबत इतकं वाईट कसं वागू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या घटनेनंतर महिलेच्या पतीवर संताप व्यक्त केला जातोय. या हत्येच्या घटनेमुळे परिसरातील नागरीक सुन्न झाले आहेत. पती-पत्नीच्या नातं इतक्या भयानक टोकाला जाऊ कसं शकतं? असा सवाल या नागरिकांना सतावतोय. एक महिला तिचं सर्वस्व सोडून पतीकडे येते. आपल्या पतीला काय हवं नको ते पाहते. सदैव त्याचाच विचार करते. असं असताना पतीने चारित्र्याच्या संशयातून तिची हत्या करणं हे अतिशय वाईट आणि चिंताजनक आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्राथमिक माहितीनुसार किरकोळ भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केलीय. पत्नीची हत्या करुन आरोपी पती हा फरार झाला आहे. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत. संबंधित घटना ही नालासोपारा पूर्वेच्या लक्ष्मी नगर परिसरात घडली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

( भंडारा : एक्स गर्लफ्रेंडच्या सततच्या त्रासाला कंटाळला तरुण; जंगलातच घेतला गळफास ) आरोपी पती बंडू कवटे (वय 50) याने आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. मयत जयश्री (वय 45) आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरुन भांडण सुरू होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुसरीकडे बंडू बेरोजगार होता. यावरून दोघांत सतत भांडण व्हायचे, अशी देखील माहिती समोर आलीय. शनिवारी रात्री अशाच प्रकारचे भांडण झाले असता या भांडणाचा राग मनात ठेऊन त्याची पत्नी साखर झोपेत असताना त्याने तिची गळा आवळून हत्या केली. सकाळी शेजाऱ्याच्या मार्फत पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात