मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वकिलाच्या फार्म हाऊसवर गेला आणि तिथेच फसला, पुण्यातला कुख्यात गुंड गज्या मारणे जेरबंद

वकिलाच्या फार्म हाऊसवर गेला आणि तिथेच फसला, पुण्यातला कुख्यात गुंड गज्या मारणे जेरबंद

कुख्यात गुंड गजानन मारणे

कुख्यात गुंड गजानन मारणे

कुख्यात गुंड गज्या मारणेला पोलिसांनी साताऱ्यातून बेड्या ठोकल्या आहेत. गज्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्यापासून तो फरार होता. पण त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पुणे, 16 ऑक्टोबर : पुणे पोलिसांनी आज साताऱ्यात जाऊन एक मोठी कारवाई केली आहे. कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका शेअर दलालाचं 20 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस गेल्या काही दिवसांपासून गज्या मारणेच्या शोधातच होते. या प्रकरणी पोलिसांनी गज्या मारणे टोळीच्या जवळपास सहा गुंडांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर पोलिसांचा सातवी टाच अखेर गज्या मारणेच्या दिशेला पडली. खरंतर पोलीस त्याचा शोधच घेत होते. पण त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागल्यापासून तो फरार झाला होता. स्वत:ची या प्रकरणातून सुटका व्हावी यासाठी रणनीती आखत होता. पण पोलिसांनी योग्यवेळी त्याच्या मुसक्या आवळल्या.

गज्या मारणे हा कुप्रसिद्ध गुंड आहे. त्याच्यावर याआधीदेखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर नुकतंच एका शेअर दलाला 20 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह आणखी 14 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस गज्या मारणेच्या शोधात होते. पण तो पोलिसांपासून लांब पळत होता. विशेष म्हणजे या प्रकरणातून आपली सुखरुप सुटका व्हावी यासाठी तो वकिलाकडे देखील गेला. पण पोलिसांनी त्याच्या योग्यवेळी मुसक्या आवळल्या.

गज्या मारणेला बेड्या ठोकणं ही पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. गज्या मारणेला अटक करणं सोपं नव्हतं. पुणे पोलिसांनी गज्या मारणेला सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातून एका फार्म हाऊसवरुन ताब्यात घेतलं. संबंधित फार्म हाऊस हे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांचं आहे. गज्या हा त्याच्या वकिलांकडे गेला होता. आपली संबंधित प्रकरणातून सुखरुप सुटका व्हावी यासाठी तो कदाचित फार्म हाऊसवर रणनीती आखत होता. पण तो वाई परिसरात आल्याची माहिती पोलिसांना लागली. त्यानंतर पुणे पोलीस साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी फार्म हाऊसवर दाखल होत गज्याला बेड्या ठोकल्या.

(इथे ओशाळलं नातं, चारित्र्याच्या संशयावरुन पतीचं टोकाचं पाऊल, नालासोपारा हादरलं)

मारणे सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने वाई परिसरातून गज्या मारणेला ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, गज्या मारणेसह साथीदार मयूर याने एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या कारणावरून पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला धमकी दिली होती. त्या प्रकरणात गज्या मारणेसह त्याच्या टोळीवर थेट मोक्काची कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण आरोपी फरार होती. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी एकामागे एक अशा गज्या मारणे टोळीच्या सहा गुंडांना पोलिसांनी पकडलं आणि अखेर सातवा फास हा गज्याच्या भोवती गुंडाळला गेला.

मागच्या तीन वर्षांपासून खून, खंडणीच्या प्रकणात दहशत माजवणाऱ्या गज्या मारणेसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पुण्यात गुंड प्रवृत्तीला खत पाणी घालणाऱ्या कुख्यात गुंड गज्या मारणेला आणि त्याच्या टोळीला पुणे पोलीसांनी चांगलेच रडारवर घेतले आहे.

गज्या मारणेने मागच्या दिड वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हजारोंच्या संख्येने दोन चाकी रॅली काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मारणेने पुणे पोलीसांना एकप्रकारे आवाहनच दिले होते, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून पुणे पोलीसांनी शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला होता.

First published:

Tags: Crime, Kidnapping, Pune