मुंबई, 16 ऑक्टोबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिलाय. शिवरायांची छत्रपती शिवाजी महाराज होण्याची गोष्ट मी सांगतोय, असे बोल राज ठाकरेंचे आहेत. हर हर महादेव हा चित्रपट एकाच दिवशी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरे यांच्यासोबत संवाद साधत अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपण पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिलेल्या फिल्मवर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती, अशी माहिती दिली. “मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर 2003 साली केलं. तेव्ही मी बाबासाहेब पुरंदरेंची रायगडावर मुलाखत घेतली होती. व्हाईस ओव्हर देणं हे माझं कधी काम नव्हतं. मी तसा कधी विचारही केला नव्हता. 2003 साली मुलाखतीत बोललो होतो. पण त्या बोलण्याला अर्थ नव्हतं. कारण ते वाचण्यासारखंच होतं. 2004 साली मी शिवसेनेचं कॅम्पेन केलं होतं. आम्ही 9 फिल्म्स केल्या होत्या. त्या सर्व फिल्म्सला माझे मित्र अजित भुरे यांनी आवाज दिला होता. एक अॅड फिल्म मुंबईतील दहशतवादी बॉम्ब हल्ल्याची होती. ती निवडणूक आयोगाने रद्द केली होती. त्या शॉर्ट फिल्मला सुरुवातीला एक मुंबई असा शब्द होता. फक्त तोच शब्द माझ्या आवाजाचा होता. इतर सर्व आवाज अजित भुरे यांचा होता. सर्व फिल्मस तयार झाल्यानंतर बाळासाहेबांनी सर्व नऊ फिल्म बघितल्या आणि मुंबई हे कोण बोललं ते विचारंल. तर अजित म्हणाले राजा बोलला. सगळ्या नऊच्या नऊ फिल्म्सला तुझा आवाज द्यायचा, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं. त्यावेळी व्हाईस ओव्हर कसा द्यायचा ते शिकायला मिळाला. अभिनेते शरद केळकर यांचं वॉईस ओव्हरमध्ये केवढं काम आहे. ती गोष्ट मला अजित भोरे यांनी शिकवलं”, असं राज ठाकरे म्हणाले.
“मी पहिल्यांदा हर हर महादेवच्या टीमला धन्यवाद देतो. तुम्ही मला आवाज द्यायला संधी दिली. माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होती की संगीतात काहीतरी करेन असं. त्यामुळे त्यांनी स्वराज ठाकरे असं नाव ठेवलं होतं. पण मी जेव्हा व्यंगचित्र काढाला लागलो तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की मी बाळ ठाकरे म्हणून व्यंगचित्र काढतो. तर तू राज ठाकरे म्हणून काढ. त्यामुळे तेव्हा माझं दुसरं बारसं झालं. त्यावेळी मी कॉलेजला जायचो”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. ( शरद पवारांच्या एका पत्रकार परिषदेने महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? फडणवीसांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष ) “मी काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर तो चांगला आहे की वाईट आहे फरक पडत नाही. चित्रपट बनवताना कष्ट घेतले आहेत की नाही ते महत्त्वाचं आहे. काशीनाथ घाणेकर चित्रपट पाहिल्यानंतर कष्ट घेतले आहेत ते जाणवलं. त्यावरुन मला वाटलं की चित्रपट निर्मात्यांना भेटायला हवं. कष्ट घेणाऱ्या माणसाने सांगितलेल्या चित्रपटाला आवाज दिला तर वाया जाणार नाही. माझ्याकडे आवाज विका म्हणून विचारायला कोणी आलं नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
“अभिजीत देशपांडे यांच्यासोबत काम करताना ते करेक्शन करताना थोडं अशी विनंती करायचे. त्यावरुन आमच्यात कदाचित थोडाफार वाद झाला असता. पण हिंदीमध्ये करताना माझ्यावर सोडा असं सांगितलं. मी आणि अजित भुरे सकाळी स्टुडिओत गेलो. सकाळी दहा वाजता गेलो. मला हवं तसं रेकॉर्ड केलं आणि त्यांना ऐकवलं. त्यावर ते म्हणाले की, छान झालं. ते चार-पाच ठिकाणं काही होती ते मी केलं”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.