पुणे, 16 ऑक्टोबर : पुण्यात महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात ते आठ गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्व जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड खळबळ उडाली. अपघातामुळे परिसरात काहीवेळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली. पण स्थानिक नागरीक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतून सुरळीत करण्यात आली. खरंतर काळाजाचा अतिशय थरकाप उडवणारी ही घटना होती. सुदैवाने ही घटना थोडक्यात निभावून गेली. या अपघातात फार मोठी जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण नक्की होतं.
संबंधित घटना ही पुण्यात पाषाण-सुस परिसरात भीषण अपघाताची घटना घडलीय. पाषाण-सुस रोडवर शिवशाही बसचा ब्रेकफेल झाल्याने ही बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेलं. त्यामुळे ही बस थेट पुढे असलेल्या दुचाकीला जोराची धडकली. बस भरधाव होती. त्यामुळे पुढची कार त्या पुढच्या कारला धडकली. अपघाताची ही मालिका एका मागेएक अशा सात ते आठ गाड्यांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे अतिशय शून्य मिनिटात डोळ्यांवर मिटलेली पापणी उघडण्याआधी जितका कमी कालावधी लागतो अगदी तितक्या वेळात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका दुचाकीचं देखील नुकसान झालं आहे.
(एक डुलकी अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात)
संबंधित शिवशाही बस बोरिवली ते सातारा असा प्रवास करत होती. या दरम्यान पाषाण-सुस रोडवर बसचा ब्रेक फेल झाल्याने संबंधित घटना घडली. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना तातडीने घटनास्थळापासून जवळ असणाऱ्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात एका बाईकचं देखील नुकसान झालं आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
पुण्यात भीषण अपघातात, शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला अन् सात ते आठ वाहन एकमेकांना धडकले, चार ते पाच जण जखमी #Pune #Aaccident pic.twitter.com/LhgTkAI0Xo
— News18Lokmat (@News18lokmat) October 16, 2022
विशेष म्हणजे पुण्यात आज आणखी एक घटना घडली. पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवेवर आज पहाटे चार वाजेच्या सुमारास एक थरार बघायला मिळाला. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला आणि चालकाच्या मनात धडकी भरली. उतारावर ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका कंटेनरला धडक दिल्यावरही चालकाने शिताफीने कंटेनरवर ताबा मिळविला. मात्र यात तो जखमी झाला. पण दैव बलवत्तर होते म्हणून मोठी दुर्घटना टळली. हा सर्व थरार एका वाहन चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Maharashtra News, Pune