मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाशिममध्ये 6 पैकी 5 पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा, मानोरा पंचायत समिती भाजपकडे

वाशिममध्ये 6 पैकी 5 पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा, मानोरा पंचायत समिती भाजपकडे

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव या 6 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Washim, India

वाशिम, 15 ऑक्टोबर : वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव या 6 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत 6 पैकी 5 पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला तर मानोरा या एकमेव पंचायत समितीवर भाजपचा विजय झाला. आजच्या पंचायत समिती निवडणुकीत मालेगांव आणि रिसोड पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालंय. तर मालेगांव व रिसोड पंचायत समित्यांमधील जनविकास आघाडीची सत्ता खेचून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

कारंजा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख यांनी बिनविरोध तर उपसभापतीपदी वंचितच्या अलका अंबरकर यांची निवड झाली.

रिसोड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केशरबाई हाडे तर उपसभापतीपदी शिंदे गटाच्या (बाळासाहेब ठाकरे शिवसेना) सुवर्णा नरवाडे यांची निवड झाली आहे.

वाशिम पंचायत समिती सभापती म्हणून सावित्रीबाई वानखेडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ) यांची तर उपसभापती पदी काँग्रेसचे गजानन गोटे यांची नियुक्ती झाली आहे.

('मला गुलाब भाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO)

मंगरुळपिर पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा भगत यांची तर उपसभापती पदी उषा राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मानोरा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या सुजाता जाधव तर उपसभापती पदी मेघा राठोड यांची निवड झाली.

मालेगाव पंचायत समिती सभापतीपदी कांग्रेसच्या रंजना काळे यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या निर्मला जाधव यांची निवड झाली आहे.

First published:

Tags: Gram panchayat, Maharashtra News, Washim