मोठ्या मुलाला उत्साहाने शाळेत पाठवलं. शाळेतही त्याला सगळ्यात मागे बसवण्यात आलं. त्याच्याशी इतर मुलं खेळत नसत. त्याला कुणी काही विचारतही नसे. फक्त एकाच कामासाठी त्याला बोलावलं जाई. ते काम होतं शाळेत झाडू मारण्याचं....
माझं भलं व्हावं असं वाटत असल्याचा दावा करणारे घरी यायचे आणि मला समजावण्याचा प्रयत्न करायचे. मुलगा कदाचित गे असेल किंवा त्याला सेक्स करता येत नसेल, म्हणून तो असं करत असावा....
मला बाळाची वाढ कशी होतेय, ते जाणून घेण्यात रस निर्माण होत होता. दोघं जेव्हा सोनोग्राफी करायला जायचे, तेव्हा मी अस्वस्थ व्हायचो. मलाही त्यांच्यासोबत आत जायचं असायचं....
आतापर्यंत 100 पेक्षाही जास्तवेळा स्पर्म डोनेशन केलं आहे. त्यातले निम्मे जरी यशस्वी झाले असतील, तरी आज मी 50 मुलांचा बाप आहे. कुणाचे डोळे माझ्यासारखे असतील, कुणाचे केस माझ्यासारखे असतील, कुणी माझ्यासारखं चालत असेल. ...
त्याने अचानक दरवाजा बंद केला. त्या क्षणी मी घाबरले पण त्याच्या डोक्यात काय सुरू होतं, याची मला बिलकूल कल्पना आली नव्हती. तेवढ्यात त्याने मला पाठीमागून पकडलं....
गॅसजवळ पोहोचून कुकरच्या दिशेनं हात पुढे केला आणि मला जोरदार धक्का बसला. एखाद्यानं उचलून पुन्हा रुममध्ये फेकून द्यावं, तसा. ब्लास्टचा जोरदार आवाज झाला. मी किचनच्या बाहेर खोलीच्या चौकटीपाशी पडलो होतो. ...
काय झालं कुणास ठाऊक! तिला अचानक त्याची शायरी आवडणं बंद झालं. तो जितक्या मनापासून तिला शायरी ऐकवायचा, तितक्याच मनापासून ती त्याचा अपमान करायची....
अगोदर सात अफेअर्स करणारी ती म्हणायची की मी कधीच कुणाच्या प्रेमात पडू शकत नाही. पण नियतीच्या मनात काय असेल ते कुणीच सांगू शकत नाही....
पहिल्यांदा त्यानं मला एम्सकडे जाण्याचा रस्ता विचारला. जेव्हा मी पत्ता सांगू लागले तेव्हा बारकाईनं माझ्याकडे पाहू लागला आणि मग विचारलं, “आर यू इंटरेस्टेड इन कमिंग विथ मी?” ...
आम्ही दोघांनी एकाच वेळी तिला पाहिलं आणि एकाच वेळी आमच्या तोंडातून डायलॉग बाहेर पडला, ‘ये भुरी आंखो वाली लडकी तुम्हारी होनेवाली भाभी है’....
तिने गॅसवरची कढई जमिनीवर फेकली. तिथला चाकू उचलला आणि माझ्यामागे लागली. तू माझं सामानच नव्हे, तर माझा पतीसुद्धा चोरलास असं किंचाळत ती माझ्याकडे झेपावली....
रोज सकाळी उठून बाल्कनीत गेल्यावर घाणेरडा वास यायचा. रस्त्यावरून कुठूनतरी येत असेल, असं आधी वाटत होतं. पण नंतर सत्य समजलं तेव्हा काय करावं, हेच कळेना. ...
शहरात नव्याने आलेल्या तरुणीला बॉयफ्रेंड तर होता, मात्र त्याला भेटताच येत नव्हतं. घरमालक मुलांना आत येऊ द्यायचा नाही, बाहेरही त्याला कुणाला भेटलेलं आवडायचं नाही. शेवटी मैत्रिणीच्या रुमवर ते दोघे भेटले. मात्र तेवढ्यात घरमालक आला आणि दार वाजवू लागला....
'पीजी'चे दरवाजे बंद झाले तरी ती परत आली नव्हती. आता काय करावं, हा प्रश्न आम्हाला पडला. मग एक कल्पना सुचली. ...
एक दिवस श्रेयाचे वडील अचानक रुमवर आले. आम्ही बाहेर होतो. त्यावेळी घऱमालकाने त्यांना सगळं काही सांगितलं. त्यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला....
अर्चितानं असं केलंय, हे समजल्यावर आम्हाला जबर धक्का बसला. अर्चिताच्या बॉयफ्रेंडलाही तेवढाच मोठा धक्का बसला होता. त्यानंही तिच्यासोबतचं रिलेशन तोडलं....
नुकसान झाल्याचं समजलं तेव्हा त्या म्हणाल्या, अरे उदास काय होतोस? अस्वलाचा एक केस गळला, म्हणून काय ते रडत बसतं का?...