लखनऊ : आजही तो प्रसंग आठवला की माझ्या काळजाचा थरकाप उडतो. कुणी इतकं राक्षसी कसं असू शकतं? कुणी कुणासोबत असं कसं वागू शकतं? विशेषतः जर तो तुमचा मित्र असेल, तुमचा कुणी खास असेल, तुमचे घरचे त्याला ओळखत असतील, तो तुमच्या कुटुंबाला ओळखत असेल तर.. एवढ्या वर्षांचा विश्वास असा एका क्षणात धुळीला मिळवावा, असं का वाटत असेल? मात्र तसं घडलं हे खरंय. त्यात माझा काय दोष होता? दोष एवढाच होता की माझ्यासोबत काम करणाऱ्या या सहकाऱ्यावर मी विश्वास ठेवला. मी आजही तो दिवस विसरू शकत नाही. आमचं पूर्ण कुटूंब गाव सोडून जेव्हा लखनऊत येऊन राहिलं, तेव्हाची ही गोष्ट. माझ्या वडिलांचं उत्पन्न खूप नव्हतं, पण आम्ही सगळे खूश होतो, एवढं नक्की. एका सामान्य कुटुंबाप्रमाणे आम्ही आमचं आयुष्य व्यतित करत होतो. आमच्याकडे कधी कधी पैशांची कमतरता जाणवायची, पण आनंद मात्र अपार होता. आमचे दिवस बरे चालले होते.
बारावी पास झाल्यावर मी मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला. पैसे नसल्यामुळे मला जो त्रास सहन करावा लागला, तो इतरांना सहन करावा लागू नये, असं मला वाटत होतं. त्यामुळे आमच्याच परिसरातील मुलांना शिकवायला सुुरुवात केली. काही दिवसांनी आमच्याच शेजारी राहणाऱ्या एकाने माझ्यासोबत मुलांना शिकवण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. मी तो प्रस्ताव मान्य केला आणि आम्ही एकत्र शिकवू लागलो. हे वाचा - HumanStory: जन्मभर केली लाकूडतोड; सत्तरीत सुरू झालं नवं करिअर, पोहोचल्या इटली, फ्रान्समध्ये एक दिवस माझा सहकारी म्हणाला की तो त्याची कुठलीशी महत्त्वाची फाईल घरी विसरून आला होता. त्याने मला सोबत घरी येण्याची विनंती केली. मी म्हणाले ठीक आहे. मी त्याच्यासोबत निघाले आणि त्याच्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच त्याने अचानक दरवाजा बंद केला. त्या क्षणी मी घाबरले पण त्याच्या डोक्यात काय सुरू होतं, याची मला बिलकूल कल्पना आली नव्हती. तेवढ्यात त्याने मला पाठीमागून पकडलं आणि ओढायला सुरुवात केली. त्यानंतर तर माझं डोकंच चालेना. काय घडतंय तेच मला समजेना. त्याने माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यानंतर मी त्याला जोरदार धक्का दिला आणि त्याच्या कानशिलात लगावून दार उघडलं आणि बाहेर पडले. मला वाटलं की त्या दिवशी जर मी जीन्स घातली नसती तर त्याचा प्रतिकार करून अशी बाहेर पडू शकले नसते. त्याची वासना अशी काही होती की मी सलवार कुर्ता किंव साडी नेसली असती, तर त्याने काय केलं असतं याची कल्पनाही मी करू शकत नाही. आजही जीन्स हा एक टॅबू मानला जातो, मात्र त्या दिवशी जीन्समुळेच मी वाचले.
त्या दिवशी मी माणसाला सैतान होताना पाहिलं. एखादा माणूस जनावर कसा होतो, हे त्या दिवशी मला समजलं. मी ही घटना कुणालाच सांगितली नाही. मात्र त्यानंतर मला जबर धक्का बसला होता. आईवडिलांवर मधूनच मी हल्ला करायचे. स्वतःला मारून घ्यायचे. हा प्रकार पाहून माझ्या घरच्यांनाही भीती वाटू लागली होती. आईवडिलांनी मला अनेक बुवाबाबांकडे नेलं. आजही मानसिक आजार हे भोंदू बाबांकडूनच ठीक करून घेतले जातात.
इथंही आमचा संघर्ष कमी झाला नव्हता. आम्ही काय करतोय, हे लोकांना कळलं तर होतं, मात्र पटत नव्हतं. बघा, या मुली जग बदलायला चालल्या आहेत, अशी आमची खिल्ली उडवली जायची. आम्ही आमचा एक ड्रेस कोड निश्चित केला होता. लाल रंगाच्या शर्टमुळे आम्हाला आजूबाजूची तरूण मुलं ‘लाल पऱ्या’ म्हणून चिडवायची. मात्र अशा प्रकारच्या अत्याचारामुळे वैतागलेल्या अनेक मुली आमच्याकडे यायच्या. कुणाचा आत्तेभाऊ, कुणाचा मामा किंवा कुणाच्या चुलत्याने त्यांच्यासोबत गैरप्रकार केलेला असायचा. हे वाचा - #HumanStory: नाक नसलेली ती महिला म्हणाली, ‘ओठांनी बिडी ओढू शकते, हेच खूप आहे’ आम्ही त्या तरुणींशी बोलायचो. त्यांना भावनिक आधार द्यायचो. त्यांच्यासाठी कायद्याची लढाई लढायचो. मी आणि माझ्या इतर एक्सपर्टनी पाच देशांच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेतलं आहे. यात मार्शल आर्ट, तायक्वांदो आणि कर्मागा यांचा समावेश आहे.
मी जेव्हा मुलींना ट्रेनिंग द्यायचे, तेव्हा मुली प्रश्न विचारायच्या की मुलाने जर आम्हाला मागून पकडलं तर आम्ही काय करू? त्यानंतर मी रेप व्हिक्टिमसोबत चर्चा केली आणि त्यांना कसं पडकण्यात आलं होतं, याची नोंद केली. त्या आधारे मी निशस्त्रकला नावाचा नवा प्रकार डेव्हलप केला. या तंत्रामुळे मी स्वतःला एवढी सक्षम मानते की तीन पुरुष जरी माझ्यासमोर उभे राहिले, तरी ते वाचू शकणार नाहीत. अखेर एका डॉक्टरकडे मी पोहोचले. एक महिना तिथं ऍडमिट झाले आणि मग मला थोडंस बरं वाटू लागलं. त्यानंतर मी ठरवलं की आपल्या सुरक्षेसाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आपली मदत करायला कुणीच पुढं येणार नाही. मी हीच गोष्ट माझ्या विद्यार्थिनींनाही शिकवली. त्यांनी मला चांगलीच साथ दिली. अशा प्रकारे ‘रेड ब्रिगेड लखनऊ’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. या संस्थेतून आम्ही मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतो. (ही अनुभव लखनऊच्या उषा विश्वकर्मा यांची आहे. त्यांनी आतापर्यंत रेड ब्रिगेडची स्थापना करून 80 हजार पेक्षा अधिक मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत.)