‘न्यूज18 लोकमत’ची मालिका “ पीजी स्टोरी ”चा हा आठवा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअर साठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. ही गोष्ट आहे आकांक्षा मिश्रा (बदललेलं नाव) हिची. मूळची रायबरेलीची असणारी आकांक्षा राजस्थानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. करत होती. सेकंड सेमिस्टरला असणाऱ्या आकांक्षानं त्या दोन वर्षात कॉलेज लाईफ भरभरून एन्जॉय केलं. खळखळून हसणं असो किंवा डोळ्यांतून घळाघळा अश्रू येणं असो, सुख आणि दुःखाचे सगळेच प्रसंग तिने मनापासून एन्जॉय केले. याच प्रवासातील काही आठवणी तिने शेअर केल्या आहेत. घरात मी सगळ्यात लाडकी होते. दोन मोठ्या बहिणी आणि आईवडिल या सगळ्यांनी तळहातावरच्या फोडासारखं मला जपलं होतं. त्यामुळे मला घरात कुठलंच काम करावं लागत नसे. हॉस्टेलमध्ये आल्यावर मात्र परिस्थिती बदलली. इथं प्रत्येक काम माझं मलाच करावं लागत होतं. अगोदर झोपेतून उठल्या उठल्या मला गरमागरम नाश्ता मिळायचा. घरभर फिरत आरामात मी नाश्ता करत असे. पण इथं मात्र नाश्त्याची आणि जेवणाची निश्चित वेळ ठरलेली होती. वेळ चुकली तर फक्त हवाच खावी लागे. थोडा वेळ लागला, मात्र हळूहळू हॉस्टेलच्या जीवनाशी सूर जुळत गेले. करिअर आणि अभ्यास यांच्या मध्ये एक टप्पा असतो, तो म्हणजे मुलांविषयीच्या कल्पना. मुलांबाबत गप्पा मारणे आणि त्यांच्या अफेअरबाबत जाणून घेण्याची उत्सुकता.
या काळात कुणाचं नवं प्रकरण जमायचं, कुणाचा ब्रेकअप झालेला असायचा. कुणाचं काय, तर कुणाचं काय. सगळ्या जणी मिळून या गोष्टी ऐकायचो आणि त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचो. याच काळात एक मैत्रिण झाली होती. तिचं नाव हर्षिता. तिनं हॉस्टेलवर आल्या आल्याच दावा केला होता की ती कधीच प्रेमात पडू शकत नाही. तिच्या आयुष्यात मुलं येत होती, जात होती. तिला कधीही त्याचं वाईट वाटायचं नाही किंवा ती निराश व्हायची नाही. आयुष्यात कधीही लोड घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, हेच तिच्या जीवनाचं सूत्र होतं. एकच आयुष्य मिळालंय, ते आनंदानं जगायचं, असा तिचा दावा होता. हे वाचा - #PGStory: रुममेट चोरायची कपडे, तिच्या बॉयफ्रेंडलाही बसला होता धक्का मी फक्त करिअरवर फोकस करते. बॉयफ्रेंड काय येतील आणि जातील. मात्र तिच्यापुढे नियतीनं काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. त्यामुळेच तर मी कधीच प्रेमात पडू शकत नाही, असं म्हणणारी ती मुलगी प्रेमात पडली. एकदम खऱ्या प्रेमात. हर्षिता जणू हवेत उडत होती. प्रत्येक गोष्टीवर भांडण करणारी, वाद घालणारी हर्षिता आता छोट्या छोट्या गोष्टींवर लाजू लागली होती. ही गोष्ट तिनं आमच्यापासून लपवून ठेवली होती. तिचं आमच्या जवळच्या हॉस्टेलमधील एका सिनिअर मुलावर प्रेम जडलं होतं. ही गोष्ट तिनं आमच्यापासून लपवून ठेवली होती. 7 अफेअर्स झाल्यावर आपलं एका तरुणावर खरं प्रेम जडलंय, हे सांगूनही कुणाला पटणार नाही, असं वाटल्यामुळे तिने ही गोष्ट आमच्यापैकी कुणालाच सांगितली नव्हती. आम्ही सगळे तिची थट्टा करू, असं तिला वाटलं होतं. एका दिवस आम्ही सगळ्याजणी फ्रेंड्स हॉस्टेलच्या बाहेर काही खाण्यासाठी म्हणून जमलो होतो. त्यावेळी तिथं हर्षितचा तो बॉयफ्रेंड तिथं आला. हर्षितानं आमची त्याच्याशी ओळख करून दिली. त्याचं नाव प्रियांक. त्यानंतर आम्ही सगळे तिथं जेवायला बसलो. जेवता जेवता अचानक हर्षिताच्या तोंडून ‘प्लीज बेबी’ असे शब्द आमच्या कानावर आले. हे वाचा - #PGStory: डेटवर गेलेल्या मैत्रिणीला बोलावण्यासाठी करावा लागला Ambulance ला कॉल हर्षिताच्या तोंडून हे शब्द ऐकून आम्ही खळखळून हसलो. हर्षितानंही मग काही लपवलं नाही. पण आम्हाला वाटत होतं की प्रियांकला जेव्हा हर्षिताच्या आधीच्या अफेअरबाबत कळेल, तेव्हा तो तिला जज करू लागेल. आम्ही तो विषय सोडून दिला. एक दिवस हर्षितानेच आम्हाला सांगितलं की तिने तिच्या बॉयफ्रेंडला सगळं काही सांगून टाकलं होतं. तिचे आधीचे बॉयफ्रेंड्स,अफेअर्स याबाबत जे घडलं ते मी त्याला सांगितलं आणि त्यावर तो हसू लागला, असं ती म्हणाली. ते ऐकल्यानंतर प्रियांकने आपल्याला थेट लग्नाची मागणी घातल्याचं तिने सांगितलं. ते ऐकून आम्हाला भारी वाटलं. पुढे त्या दोघांचं लग्न झालं. आम्ही आजही एकमेकांच्या संपर्कात आहोत.