जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / #HumanStory : लोकं समजवायचे, मुलगा गे असेल म्हणून व्हर्जिनिटी टेस्टला नकार देतोय

#HumanStory : लोकं समजवायचे, मुलगा गे असेल म्हणून व्हर्जिनिटी टेस्टला नकार देतोय

#HumanStory : लोकं समजवायचे, मुलगा गे असेल म्हणून व्हर्जिनिटी टेस्टला नकार देतोय

माझं भलं व्हावं असं वाटत असल्याचा दावा करणारे घरी यायचे आणि मला समजावण्याचा प्रयत्न करायचे. मुलगा कदाचित गे असेल किंवा त्याला सेक्स करता येत नसेल, म्हणून तो असं करत असावा.

  • -MIN READ
  • Last Updated :

महाराष्ट्रातील कंजारभाट समुदाय. इथं वर्षानुवर्षं मुलींची व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते. पती-पत्नीला लग्नानंतर लगेच शारीरिक संबंध ठेवायला सांगण्यात येतं. सोबत एक पांढरी चादर दिली जाते, जी मुलीच्या भवितव्याचा फैसला करते. 2018 साली ऐश्वर्या आणि तिच्या भावी पतीनं ही टेस्ट करायला साफ नकार दिला. त्यानंतर शिव्या, धमक्या आणि सामाजिक बहिष्काराचा सामना या दोघांना करावा लागला.   मी नववीत असताना मोठ्या बहिणीचं लग्न झालं. लग्नाच्या वेळी तिचे पिरीयड्स सुरू होते. त्यावेळी तिची विदाई तर झाली, मात्र चारच दिवसांत ती परत आली. बहीण, तिचा पती, कुटुंबीय आणि सगळे वऱ्हाडी. सगळे मिळून साठेक लोक असतील. पंचांनाही बोलावण्यात आलं. त्यांनी माझ्या बहिणीला आणि तिच्या पतीला लॉजवर पाठवलं. सोबत आणखी 4 लोक होते. मुलाकडून 2 आणि मुलीकडून 2. जोडप्याला अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला.   दीदीला स्वतःला ‘सिद्ध’ करायचं होतं याच दरम्यान तिच्या वजायनाला जखम झाली. मोठा रक्तस्त्राव सुरू झाला होता. तातडीनं तिला इस्पितळात नेण्यात आलं. तिथं तिला कितीतरी टाके पडले. त्यानंतर रक्त थांबलं. एकीकडे दीदी रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत होती, तर दोन्हीकडचे एकमेकांशी भांडत होते. नवऱ्याकडच्या मंडळींचं म्हणणं होतं की जखम झाल्यामुळे रक्त आलंय, पण मुलगी व्हर्जिन नाहीय. तर आमच्या घरच्यांचं म्हणणं होतं की मुलगी शंभर टक्के व्हर्जिनच आहे. आता हे सिद्ध करण्यासाठी आणखी एक टेस्ट करण्याचा निर्णय़ झाला. आमच्याच समाजातील एका बाईनं तिची ‘’टू फिंगर’ टेस्ट केली.  

News18

आदल्या रात्री तिच्या वजायनाला टाके पडले होते आणि दुसऱ्याच दिवशी तिची ‘टू फिंगर’ टेस्ट होत होती. मी हा प्रकार जवळून बघत होते. काही समजत नव्हतं, मात्र सगळं लक्षात राहिलं.   हे वाचा -  #HumanStory: मूल होत नसणाऱ्या मित्रासाठी दिले Sperm, ताटातूट होती वेदनादायक मला पहिल्यांदा पीरियड्स आले तेव्हा मी दहावीत होते. आईला सांगितल्या सांगितल्या तिनं मला एका खोलीत नेलं. दरवाजा बंद केला. मला खाली बसवलं आणि समजावून सांगितलं. आता तू मोठी झाली आहेस. सांभाळून राहा. लग्नाच्या दिवशी तुझी इज्जत लुटली जाईल. मी लहान होते, पण इज्जत लुटली जाण्याचा अर्थ समजत होता. आई म्हणाली की तुझी आजी, मावशी, काकी, मामी सगळ्यांनाच हे करावं लागलं. त्यामुळे सगळ्या लग्नाच्या परीक्षेत पास झाल्या.   अनेक वर्ष अशीच इज्जत सांभाळून होते. दरम्यान, अनेकींची लग्न झाली. प्रत्येक लग्नात हाच तमाशा व्हायचा.   लग्नानंतर लगेच मुलीला लॉजवर पाठवलं जायचं. सोबत मुलाचा भाऊ आणि वहिनी आणि मुलीचेही भाऊ-वहिनी असायचे. लॉजवर पोहोचल्यावर दोघांचीही झडती घेतली जायची. त्यांनी कुठं ब्लेड किंवा इतर टोकदार वस्तू तर लपवली नाहीय ना, याची खातरजमा केली जायची. तरुणीच्या शरीरावर कुठे जखम तर नाही ना, हेही पाहिलं जायचं. मुलगी किंवा मुलगा यांच्यापाशी रक्ताची बाटली वगैरे नाही ना, याचाही शोध घेतला जायचा.   दोघांना केवळ एक पांढरी चादर घेऊन खोलीत पाठवलं जाई.   खोलीचीही अगोदर झडती घेतलेली असायची. तिथं कुठली टोकदार वस्तू तर नाही ना, याचा शोध घेतला जायचा. नव्या जोडप्याला अर्ध्या तासाचा वेळ दिला जायचा. या काळात इतर चौघे खोलीच्या बाहेरच बसलेले असायचे. बरोबर अर्ध्या तासाने दरवाजा ठोठावला जाई. सगळं काही नीट सुरू आहे ना, हे विचारण्यासाठी. नवरा बायकोला पॉर्न बघण्याचा सल्ला दिला जायचा, जेणेकरून त्यांच्यावर असणारं ‘परफॉर्मन्स’चं प्रेशर कमी व्हावं.   हे वाचा -  #HumanStory : स्पर्म डोनरची गोष्ट! पॉकेटमनीसाठी केली सुुरुवात, आता वाटतं ही माझी मुलं आहेत? अनेकदा असंही व्हायचं की बाहेरचं एखादं जोडपं जाऊन लाईव्ह डेमो द्यायचं. किंवा एखादी महिला जाऊन संबंध योग्य रितीनं प्रस्थापित होतायत ना, हे पाहायची.  

News18

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत भरायची. त्यात मुलाला विचारलं जायचं, तुला जो माल मिळाला, तो खरा होता की खोटा? चादरीवर रक्ताचे डाग असतील, तर मुलगा म्हणायचा खरा. नसतील तर म्हणायचा खोटा. खोटं म्हणाला तर मुलीला शिव्याशाप द्यायला सुरुवात व्हायची. तो कोण होता, हे कधी झालं असले वाह्यात प्रश्न विचारले जायचे. मुलीनं कितीही समजावण्याचा प्रयत्न केला, तरी कुणी ऐकायचं नाही. कुणाचं ना कुणाचं नाव तिच्या तोंडून ऐकणं हेच पंचायतीचं ध्येय असायचं.   साखरपुड्यानंतर विवेकला भेटले तेव्हा तो म्हणाला की माझ्या पत्नीनं व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी, असं मला अजिबात वाटत नाही. तू माझी साथ देशील का? मी होकार दिला. पहिल्यांदा असा पुरुष पाहिला जो महिलांना आदर देत होता. मी होकार देताच सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात झाली. विवेकशी माझं लग्न लावायला तयार झालेले माझ्या घरचे या लग्नाला विरोध करू लागले. मला ओरडू लागले.   माझं भलं व्हावं असं वाटत असल्याचा दावा करणारे घरी यायचे आणि मला समजावण्याचा प्रयत्न करायचे. मुलगा कदाचित गे असेल किंवा त्याला सेक्स करता येत नसेल, म्हणून तो असं करत असावा. तू या लग्नाला स्पष्ट नकार दे, असं सांगायचे.   हे वाचा -  #HumanStory : भाड्याने रडणाऱ्या ‘रुदाली’ची कहाणी, एका दिवसाला मिळायचे 50 रुपये लग्नानंतर जेव्हा ही गोष्ट तुझ्या लक्षात येईल, तेव्हा उशीर झालेला असेल. अशा मुलासोबत लग्न करू नकोस. हा साखरपुडा मोडून टाक. या मुलाशी माझं लग्न होणार नाही, असा फैसला माझ्या घरच्यांनीही माझ्या परस्पर करून टाकला. हळद, मेंदीचा कार्यक्रम अगोदरच झाला होता, पण आता या मुलाशी माझं लग्न होऊ देणार नाही, असं दादांनीही सांगितलं. मग मी पण अडून बसले. याच्याशी लग्न झालं नाही तर मी आत्महत्या करेन, अशी भूमिका घेतली. ही धमकी नव्हती. लहानपणापासून आजवर अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. मला तो अपमान सहन होणारा नव्हता.  

News18

मी आणि विवेकनं अशा कुठल्याही टेस्टला स्पष्ट नकार दिला. आता आम्हाला बिरादरीतून बाहेर काढण्यात आलं होतं. सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा. आम्हाला कुणीच बोलावत नाही. काही दिवसांपूर्वीच विवेकचे आजोबा वारले. त्यानंतर व्हॉट्सअप व्हिडिओ तयार करून फिरवण्यात आला की यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी कुणीही जाऊ नये.   घाबरून कुणीही आलं नाही. सगळ्यांना वाटतं की आमच्या घरी आलं तर आपलं नुकसान होईल.   या घटनेला एक वर्ष उलटलं मात्र तरीही परिस्थिती तशीच आहे. माझ्या आईलाही येता जाता टोमणे ऐकावे लागतात. तिच्या दृष्टीनं सुशिक्षित असूनही आम्ही चुकीच्या मार्गाने गेलो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात