छोट्या शहरातून मेट्रो सिटीत आलेली तरुणी कुठल्याही तरुणासोबत फिरताना दिसली, तर लोकांच्या नजरा लगेच बदलतात. प्रत्येक जण तिला चरित्रहिन समजू लागतो. अशाच एका PG म्हणून राहणाऱ्या मैत्रिणीची गोष्ट ————————————————————————————– ‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “पीजी स्टोरी”चा हा पाचवा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. -————————————————– कुणासोबत कॉफी प्यायला जाणं हा टाईमपास वाटतो. ती सध्या कुटुंबापासून दूर आहे, तिचे जुने मित्रमैत्रिणी इथं नाहीत, ही गोष्ट कुणी समजूनच घेत नाही. कुणासोबत आपला आनंद आणि दुःख शेअर करायचं? एका मैत्रिणीच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं. तिलाही तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवण्याची संधीच मिळत नव्हती. ती पीजीमध्ये राहत होती आणि तिथं मुलांना यायला मनाई होती. एकवेळ पीजी मालकाची नजर चुकवून रुमवर पोहोचावं, तर तिथं तिच्या इतर रुम पार्टनर असत. क्षणभर तिच्यासोबत शांतपणे बोलत बसावं, यासाठी जागाच नव्हती. घराच्या बाहेर त्याला भेटावं, तर तो घरमालकांना बाहेरख्यालीपणा वाटायचा. पीजी म्हणून राहत असताना घरात कुणाला यायला तर मनाई होतीच, मात्र घराबाहेर असताना कुणाला भेटणं हेही त्याला बिलकूल आवडत नसे. #PGStory: डेटवर गेलेल्या मैत्रिणीला बोलावण्यासाठी करावा लागला Ambulance ला कॉल मी त्या काळात दिल्लीतील रजौरी गार्डन परिसरात राहत होते. माझी मैत्रिण शेजारच्याच पीजीमध्ये राहत होती. तिचा बॉयफ्रेंड कित्येक महिन्यांनी दिल्लीत आला होता आणि मी दिल्लीबाहेर होते. माझं घर रिकामं होतं. तिनं माझी परवानगी घेतली आणि ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत तीन-चार दिवस माझ्या घरात राहिली. मात्र याच दरम्यान काही किरकोळ माहिती घेण्यासाठी घरमालक तिथं आला. त्यानं बराच वेळ दरवाजा वाजवला. मात्र म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणे. त्यामुळे मैत्रिणीने दरवाजाच उघडला नाही. दार न उघडल्यामुळे घरमालकाला वाटलं की काहीतरी गडबड आहे. त्यावेळी तो तिथून निघून गेला. मैत्रिणीने मला फोन केला. मग मी काहीतरी वेगळीच गोष्ट रचून घरमालकाला फोन करून ऐकवली. पण पुढच्या दिवशी सकाळीच तिचा मित्र तिथून निघून गेला. मलाही यापेक्षा जास्त रिस्क घ्यायची नव्हती. जर घरमालकाला संशय आला असता, तर त्यानं मला घर सोडायला सांगितलं असतं. हे घर शोधताना, सगळ्या वस्तू जमवताना आणि त्या लावताना माझी काय दमछाक झाली होती माहित आहे? मला पुन्हा हे सगळं करायची अजिबात इच्छा नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.