‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “ पीजी स्टोरी ”चा हा सातवा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअर साठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. ही गोष्ट अनुप शुक्ला (बदललेलं नाव) नावाच्या तरुणाची आहे. पुण्यातील एका मल्टिनॅशनल कंपनीत तो जॉब करत आहे. अनुप हा मूळचा हरदोई जिल्ह्यातला. त्यानं कानपूर आयआयटीतून बी.टेक. केलं. या काळात तो भरभरून आयुष्य जगला. अभ्यासासोबतच त्याने प्रचंड मौजमजाही केली. त्याच काळात घडलेला हा किस्सा. माझं आयुष्य जेव्हा पुस्तकांनी व्यापून गेलं होतं, त्या काळातील हा किस्सा. सेकंड सेमिस्टरमध्ये चांगले मार्क्स मिळवण्याचं जाम प्रेशर होतं. पहिल्या सेमिस्टरमध्ये गडबड झाली होती आणि मार्क्स कमी मिळाले होते. त्यामुळं घरच्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली होती. वडील तर अचानक शोलेतले ‘गब्बर सिंग’ झाले होते. आईचा रागही तेवढाच होता. दोघंही खांद्याला खांदा लावून माझी खरडपट्टी काढत होते. यात एकमेव आधार होता तो माझ्या लाडक्या छोट्या बहिणीचा. माझ्यावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिला वाटायचं की मी म्हणजे सुपरस्टारच आहे. पण प्रत्यक्षात मी काय आहे, हे तर माझ्या मनालाच नीट माहित आहे. गोष्टी, साहित्य, कविता यांच्यात रस असणारा मनुष्य जेव्हा फिजिक्स, केमिस्ट्रीच्या सूत्रांमध्ये फसतो, तेव्हा काय होतं, हे माझं मलाच माहित. असो. तर आता येऊ मूळ मुद्द्यावर.
तर झालं होतं असं की सेकंड सेमिस्टर परीक्षा सुरू व्हायला काही दिवसच उरले होते. अभ्यासाच्या नोट्स बेडपासून ते जेवणाच्या टेबलपर्यंत पसरल्या होत्या. त्याच काळात कँपसमध्ये एक घोषणा झाली की एका ‘कल्चर नाईट’चं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात वेगवेगळ्या राज्यांतल्या कॉलेजचे तरुण तरुणी सहभागी होणार होते. हा कार्यक्रम सेकंड सेमिस्टर परिक्षेनंतर होणार होता. याच आनंदात आम्ही दिवसरात्र अभ्यास करू लागलो. माझा रुममेट राहुलशी गप्पा मारायलाही मला त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, एवढे आम्ही अभ्यासात व्यस्त झालो होतो. असं करता करता परिक्षेचे ते ‘नकोसे’ दिवस एकदाचे सरले आणि परीक्षा संपली. मग कल्चरल नाईटचा मौसम सुरू झाला. त्या नाईटच्या कल्पनेनंही माझ्या आणि राहुलच्या मनात गिटार वाजायला सुरुवात व्हायची. कल्चर नाईट प्रोग्रामचा तो मोठा दिवस आला. सकाळी सकाळीच अनेक राज्यातील तरुण आणि सुंदर सुंदर तरुणी कॉलेजच्या कँपसमध्ये दिसायला सुरुवात झाली होती. माझ्या प्रत्येक गोष्टीतील आणि कवितेतील नायिकाच शोभाव्यात, इतक्या सुंदर मुली आजूबाजूला दिसत होत्या. आमच्या समोरून एकामागून एक अनेक मुली जात होत्या. तेवढ्यात आम्हा दोघांचीही नजर एकाच तरुणीवर खिळली. अर्थात, त्या मुलीविषयी आम्हाला काहीच माहित नव्हतं. मात्र मुलांमध्ये प्रसिद्ध असणारा तो डायलॉग ‘ये भुरी आंखोवाली लडकी तुम्हारी भाभी है’ एकाच वेळी दोघांच्याही तोंडून बाहेर पडला. एकमेकांच्या तोंडून हे वाक्य ऐकून असं वाटलं की जणू काळजात कुणी खंजीरच खुपसला. आम्ही जणू काही एकमेकांचे कट्टर शत्रू आहोत, या भावनेनं आम्ही एकमेकांकडे पाहिलं. त्याच वेळी मला आमीर खानच्या ‘थ्री इडियट’ सिनेमाची आठवण झाली. त्यात दाखवल्याप्रमाणे मित्राची प्रगती व्हावी, असं सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्यापेक्षा जास्त व्हावी, असं मात्र वाटत नाही. ही गोष्ट केवळ करियरपुरती मर्यादित नाही, तर प्रेमालाही लागू होते, हे माझ्या लक्षात आलं. ज्या मुलीवरून आमच्यात एवढं वितुष्ट निर्माण झालं होतं, प्रत्यक्षात तिला यातलं काहीच माहित नव्हतं. ती आमच्या समोरून गेली आणि स्वतःच्या रुमवरही पोहोचली. मग राहुल म्हणाला की ठीक आहे. तुला जर ऐकायचं नसेल, तर आपण एक काम करू. आपण दोघंही कल्चरल नाईट संपल्यानंतर आपापल्या प्रेमाची कबुली तिच्याकडे देऊ आणि तिला प्रपोज करू. त्यानंतर ज्याचं प्रपोजल ती स्विकारेल, त्याची होईल. आपण कशाला आपापसात भांडायचं? मला राहुलचा हा प्रस्ताव आवडला. कल्चरल नाईट सुरू झाली. एकामागून एक अनेक परफॉर्मन्स झाले. त्यानंतर त्या घाऱ्या डोळ्यांच्या मुलीचा डान्स होता. तिला स्टेजवर पाहिल्यानंतर माझ्या पुन्हा एकदा मैत्रीवरून विश्वास उडाला. मी आणि राहुल दोघांनाही असंच वाटत होतं की एका व्यक्तीनं तिला प्रपोज करू नये. हा विचार करता करता आणि तिचा डान्स पाहता पाहता वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. अजून एक दोन डान्स आणि नंतर डिबेट प्रोग्राम झाला. मग कार्यक्रम संपला. त्याबरोबर आमची कहाणीही संपली. पुढच्या दिवशी त्या मुलीला पुन्हा तिच्या कँपसमध्ये जायचं होतं आणि तिला प्रपोज करण्याची आम्हा दोघांपैकी कुणाचीही हिंमत झाली नाही. आम्ही बसमध्ये बसलेल्या तिला फक्त बाय-बाय करत राहिलो. हा प्रसंग आठवला की आजही आम्ही खळखळून हसतो.